धुळे : प्लॉस्टिक बंदी असतांनाही नागरिक सर्रापणे प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर करीत आहे़ अशा नागरिकांवर कारवाई न करता प्लॉस्टिक पिशव्या हातात धरून येणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या कर्मचारी त्यांच्या हातातील ती पिशवी घेऊन त्यांना कापडी पिशवी देणार आहे़ मनपाची ही गांधी लवकरच शहरात राबविली जाणार आहे़राज्यातील शहरे चकाचक व्हावीत, स्वच्छ महाराष्ट्र अथवा स्वच्छ भारत मिशनला चालना मिळावी, यासाठी राज्यात १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांच्या काळात हीरक महोत्सव राबविण्यात येणार आहे़ मनपाकडून निर्णयाची आज पासून अंमलबजावणी केली जाणार आहे़ तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटकवुन दिले जाणार आहे़ स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने प्रत्येक प्रभागात दोन महिन्याच्या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे़आग्रारोडवर विशेष उपक्रममानवी आरोग्यास हाणीकारक असलेल्या प्लॉस्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे़ मात्र नागरिकांना वांरवार कारवाई करूनही समस्या मार्गी लागत नसल्याने हीरक महोत्सवाचे औचित्य साधत शहरातील आग्रारोडवर थैला बॅकेचा उपक्रम राबविणार आहे़ उपक्रमाद्वारे प्लॉस्टिक पिशव्यामध्ये साहित्य घेऊन येणाºया नागरिकांना विंनती करून प्लॉस्टिक पिशवी त्यांच्याकडून घेऊन त्यांना कापडी पिशवी देणार आहे़ त्यासाठी संबधित व्यक्तीकडून १० रूपये शुल्क घेणार आहे़ मनपाकडून दिलेली कापडी पिशवी दुसºया दिवशी परत केल्यास त्यांना आठ रूपये परत दिले जाणार आहे़ या कापडी पिशव्या महापालिकेला बचत गटामार्फेत उपलब्ध होणार आहे़सांडपाणी व्यवस्थापनस्वच्छता अभियानात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात येत होता. मात्र, या हीरक महोत्सवी महाराष्ट्र अभियानात सर्व शहरांच्या प्रशासनाला त्यांच्या शहरांतील नाल्यांची सफाई करून ते स्वच्छ करण्यास सांगण्यासाठी नागरिकांना प्रबोधन केले जाणार आहे़ या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून त्यांना त्यात कचरा टाकण्यास परावृत्त करणे, पांझरा नदी तसेच पुलाखालची जागा स्वच्छतेसाठी आवाहन करणे़ जनजागृतीसाठी शहरात जाहिरात फलक लावणे आदी उपक्रम राबविले जातील़त्यांच्यावर दंडात्मक कारवाई१ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत हा घर ते घर संकलन १०० कचरा संकलन करणे, ओल्या कचºयावर शास्त्रोक्त प्रकिया, सुक्या कचºयावर प्रक्रिया, जुन्या साठवलेल्या कचºयावर बायोमायनिंग, शहरामधील जुने बांधकाम पाडल्यावर किंवा बांधकाम चालू असतांना बांधकामाचा कचरा निर्माण होता़ बांधकाम आणि पाडकाम कचरा नियम २०१६ नुसार या साहित्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबधित कचरा निर्मात्यांची आहे़ परंतू बहूतांश वेळा हे साहित्य संबधितांमार्फेत रस्तावर फेकले जाते़ अशा बांधकाम धारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़ त्यासाठी महापालिका स्वच्छता व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रभागाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे़अन्यथा कचरा घेणे टाळणारशहरातील ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी ७९ घंटागाडीची व्यवस्था केली आहे़ नागरिकांनी घंटागाडीत ओला व सुका कचरा टाकावा, यासाठी आवाहन करूनही नागरिक आवाहनाकडे दुर्लक्ष करीत घंटागाडीत ओला सुका-कचरा वेगळा न करता एकत्र टाकता़ नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकण्याची शिस्त लागावी़ यासाठी घंटागाडीवर कर्मचारी ओला- ुसुका कचरा एकत्र असल्यास तो कचरा नाकारणार आहे़नागरिकांना विनंती करणारधुळे शहर स्वच्छ शहर होण्यासाठी तसेच शासनाच्या निर्णयाची अंमल बजावणी होण्यासाठी नागरिकांना कापडी पिशव्या वापरण्याची विनंती तसेच व्यापाºयांना प्लॉस्टिक पिशव्या ग्राहकांना देऊ नका असे आवाहन केले जाणार आहे़ त्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था एकत्र या मोहिमेत सहभागी होणार आहे़
मनपा राबविणार ‘थैला बॅके’चा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:39 IST