शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मुग, उडीदची पेरणी आता अशक्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:56 IST

धुळे जिल्ह्यातील स्थिती : पाऊस लांबल्यास बाजरी, ज्वारी, मका पिक घेण्यावर द्यावा लागेल भर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात कपाशी, मका, बाजरीच्या खालोखाल मूग, उडीदाची लागवड करण्यात येत असते. मात्र यावर्षी जिल्हयातील काही भाग वगळता अजुनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. अजून एक आठवडा पाऊस आला नाही, तर मूग, उडीद पिके घेता येणे अशक्य आहे,  अशी स्थिती आहे. या संदर्भात आता कृषी विभागानेही शेतकºयांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केलेली आहे.  यावर्षी उन्हाची तीव्रता प्रचंड होती. तापमानाचा पारा ४५ ते ४७ डिग्री सेल्सीयसपर्यंत गेला होता. तापमान वाढल्याने, पाऊस दमदार होईल असा सर्वसामान्यांचा अंदाज होता. त्यातच हवामान विभागाने सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज वर्तविल्याने, शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दरम्यान पावसाचा अंदाज लक्षात घेऊन, शेतकºयांनी खरीप हंगामासाठी शेती तयारी करून ठेवली. बि-बियाणे, खते घेऊन ठेवली आहेत. ८ जूनपासून मृग नक्षत्रास सुरूवात झाली. दरवर्षी या नक्षत्रात पाऊस पडून पेरण्यांनाही सुरूवात होत असते. गेल्यावर्षी २३ जून रोजी झालेल्या दमदार पावसानंतर जिल्ह्यात पेरण्या सुरू झाल्या होत्या. मात्र यावर्षी मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले आहे. पाऊस लांबल्याने आता पेरण्याही लांबलेल्या असून, शेतकºयांचे डोळे आता आभाळाकडे लागलेले आहे. कृषी विभागाने २०१९-२० या खरीप हंगामात जवळपास ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट प्रस्तावित केलेले आहे. यात २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड प्रस्तावित असून, उर्वरित १ लाख ८३ ८०० हेक्टर क्षेत्रावर मूग, उडीद, तूर, मका, नागली, भात आदी पिकांची लागवड करण्यात येत आहे.अजून पेरणीला सुरूवात नाहीगेल्या तीन-चार दिवसात शिरपूर, साक्री तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. मात्र अजुनही पेरणी योग्य असा ६५ मिलीमीटर पाऊस कुठेच झालेला नाही. त्यामुळे  जिल्ह्यात कुठेच पेरणी सुरू झालेली नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.मूग, उडीदाची लागवड अशक्यजिल्ह्यात कपाशी, मका, बाजरीच्या खालोखाल मूग, उडीदाची लागवड करण्यात येते. कमी कालावधीत येणारी ही पिके घेण्याकडे शेतकºयांचा कल असतो. कृषी विभागाने यावर्षी जिल्ह्यात मुगाची १८ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर तर उडीदाची ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित केली होती. मात्र यावर्षी आतापर्यंत पाऊस लांबलेला आहे. एका आठवड्यात पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नाही तर मुग, उडीदाची लागवड करणे अशक्य होणार आहे. ेलागवड केली तरी उत्पादन घटणारदरम्यान अपेक्षित पाऊस होऊन उडीद, मुगाची लागवड केली तरी त्याची अपेक्षित उगवण होणे अशक्य आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मका, बाजरीचे क्षेत्र वाढेल मुग, उडीदाची लागवड न झाल्यास शेतकºयांना त्या क्षेत्रावर मका,  ज्वारी, बाजरी पिकाची  लागवड करता येणार आहे. कपाशीची लागवडीची आशाशेतकºयांचे नगदी पीक म्हणून कपाशीकडे बघितले जाते. गेल्या दोन तीन दिवसात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ स्वरूपात कपाशीची लागवड सुरू झालेली आहे. अजुनही १० जुलैपर्यंत दमदार पाऊस झाल्यास, शेतकºयांना कपाशीची लागवड करता येऊ शकेल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. पूर्व  हंगामी कपाशीला पाण्याची गरजजिल्ह्यात ज्यांच्याकडे पाण्याची थोड्याफार प्रमाणात उपलब्धता आहे, अशा शेतकºयांनी पूर्व हंगामी कपाशीची लागवड केली होती. त्याचे क्षेत्र जवळपास २० हजार हेक्टर एवढे आहे. मात्र आता विहिरींनी तळ गाठल्याने, पूर्व हंगामी लागवड केलेल्या कपाशीला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित झाला आहे. पाऊस न झाल्यास हे पीक धोक्यात येऊ शकते असा अंदाज आहे. महाबीजकडे  केली मागणी

जिल्हयात अजुनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही दिवसात पाऊस न झाल्यास शेतकºयांना मुग, उडीद ऐवजी मका, बाजरी, ज्वारी या पिकाची लागवड करावी लागणार आहे. अशा आपत्कालीन स्थितीत बियाण्यांची टंचाई भासू नये म्हणून कृषी विभागाने अगोदरच महाबीजकडे मका, ज्वारी, तुरीचे जादा बियाणे उपलब्ध करून द्यावे यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे