शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील मोगलाईत हाणामारी, तिघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:53 IST

भोईवाड्यातील घटना : लग्नात नाचण्याचे झाले निमित्त

ठळक मुद्देमोगलाईतील भोईवाड्यात घडली घटनाहाणामारीत काठीचा वापर झाल्याने तणावघटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने शांतता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लग्नात नाचण्याच्या कारणावरुन शहरातील मोगलाईतील भोईवाड्यात शनिवारी रात्री हाणामारीची घटना घडली़ अचानक झालेल्या या घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने तणाव निवळला होता़ याप्रकरणी तिघांविरुध्द शहर पोलिसात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला़ शहरातील साक्री रोडवर मोगलाई भागालगत भोईवाडा आहे़ या ठिकाणी लग्न असल्यामुळे वाजंत्रीवर नाचण्याचा कार्यक्रम सुरु होता़ यात नाचण्याच्या कारणावरुन शाब्दिक चकमक उडाली़ वादाचे पडसाद हाणामारीत झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ हाणामारीची ही घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ यात काठीचा सर्रासपणे वापर झाल्याने पप्पू इस्माईल शेख (१९) रा़ फुलेनगर, मोगलाई याला डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली़ त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ याप्रकरणी पप्पू इस्माईल शेख याने शहर पोलिसात रविवारी पहाटे साडेबारा वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, पप्पू वाडीले, सोनू वाडीले, नंदू वाडीले (पुर्ण नाव माहित नाही) (सर्व रा़ मोगलाई, धुळे) यांच्याविरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आऱ बी़ मांडेकर करीत आहेत़