कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा शाळा महाविद्यालयासह क्लासेस बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शाळेकरी मुलांसह स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनादेखील ऑनलाइन क्लास घ्यावे लागत आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दरवर्षी प्रशासकीय क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांकडे वळतांना दिसून येत आहे. मात्र काेरोनामुळे दोन वर्षांपासून एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक निश्चित राहात नसल्याने विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. मराठा आरक्षण आणि कोरोनामुळे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा सुमारे दोन वर्षांपासून पुढे ढकलल्या जात आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीवर विपरीत परिणाम करणारा आहे. शासनाने कोरोना नियमांचे पालन करून मार्ग काढण्याची गरज आहे.
विद्यार्थांचे वय निघून चालले
दोन वर्षांपासून एमपीएसीचा अभ्यास करीत आहे. अनेकदा परीक्षा दिल्यात मात्र परीक्षेची तारीख कळविल्यानंतर ही परीक्षा दिलेल्या तारखेला होत नाही.
विजय पाटील
प्रशासकीय क्षेत्रात करिअर म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वेळापत्रक निश्चित नसल्याने निराशेचे वातावरण आहे.
संजय माळी