शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोबत फिरणाºया बहिणी सोबतच निवर्तल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:38 IST

भील परिवारावर काळाचा घाला : पुरमेपाडा ता.धुळे येथे वीज कोसळून घडलेली दुर्देवी घटना  

धुळे : तालुक्यातील पुरमेपाडा शिवारातील चुडामण नगरात राहणाºया दोन चुलत बहिणी़ घरातील कामांमध्ये सहभाग नोंदविणे, कुठेही जायचे असेल तर सोबत फिरणे़ असे सुरळीत सुरु असताना अचानक वीज कोसळून तिघे जखमी झाल्या़ यात ज्या गंभीर जखमी झाल्या त्यांचा उपचार घेताना मृत्यू ओढवला़ सोबत फिरणाºया बहिणी सोबतच निवर्तल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़ धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील चुडामण नगरात भील परिवार वास्तव्यास आहे़ कैलास रामसिंग सोनवणे (भील) यांची पत्नी व त्यांना दोन मुली आहेत़ त्यांना कौशल्या नावाची १६ वर्षाची मोठी मुलगी आहे़ तसेच त्यांचा चुलत भाऊ देवा अर्जुन सोनवणे (भील) हे त्यांची पत्नी व १५ वर्षाची मुलगी छाया असे सोबत राहतात़ तसेच त्यांचा चुलत भाऊ खंडू अर्जुन सोनवणे (भील) हे त्यांची पत्नी व १६ वर्षाची मुलगी सविता असे सोबत राहतात़ हे सर्व जण मजुरीचे काम करुन आपआपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात़ गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावाच्या शिवारात असलेल्या बोरी नदीच्या जवळ कौशल्या कैलास सोनवणे, छाया देवा सोनवणे, सविता खंडू सोनवणे हे नेहमीप्रमाणे बोरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या़ पावसाळी वातावरण होते़ बारीक पावसाची संततधार सुरु होती़ वीज कोसळेल असे काही चिन्हे नव्हती़ असे असलेतरी अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला, पाऊस येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आणि अचानक वीज कोसळली़ पाऊस आल्याने या तिघी आपले कपडे धुण्याचे काम आटोपून घराकडे परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली़ यात त्या तिघांना गंभीर दुखापत झाल्याने त्या बेशुध्दच पडल्या़ त्या बेशुध्द पडल्याचे गावातील समाधान परशुराम सोनवणे यांनी पाहीले़ या तिघींना तातडीने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालायात उपचारासाठी दाखल केले आणि सविता हिला आर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ वैद्यकीय उपचार सुरु असताना कौशल्या सोनवणे आणि छाया सोनवणे या दोघींचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ शिवम पावरा यांनी गुरुवारी दुपारी  झाल्याचे घोषीत केले़ तर जखमी  सविता सोनवणे हिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु   आहेत़ बोरी नदीच्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेलाविंचूर - तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी शरद नथू पाटील (४१)  रा.धामणगाव हे संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास धामणगाव शिवारातून धामणगाव ते खोरदड रस्त्याने शेतातून घरी येत असतांना बोरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन पाण्यात पडले आणि वाहून गेल्याची दुदैर्वी घटना घडली. रात्री उशिरापर्यंत  शरद पाटील यांचा मृतदेह मिळून आलेला नाही.  दरम्यान ,बोरीनदीवरच पुढे पारोळा जि.जळगाव येथे तामसवाडी धरण आहे. सन २०१७- १८ साली  देखील अचानकपणे रात्री नदीला पूर आल्याने  जनावरांची मोठया प्रमाणात जिवीत हानी झाली होती. याठिकाणी वारंवार पुलाची मागणी करुन देखील ती पूर्ण झालेली नाही.

टॅग्स :Dhuleधुळे