धुळे : सलून व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले़महाराष्ट्र सलून अॅण्ड पार्लर असोसिएनशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ सलून दुकानदारांना आर्थिक मदत करावी, पूर्ण वेळ व्यवसाय करण्यास सशर्थ परवानगी द्यावी, इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करुन अॅट्रॉसिटी कायद्याचे सुरक्षा कवच उपलब्ध करुन द्यावे, आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटूंबियांना दहा लाखांची आर्थिक मदत द्यावी, सहा महिन्यांचे भाडे देण्यासाठी आर्थिक मदत करावी, विजबील माफ करावे, केशकला बोर्ड आर्थिक विकास महामंडळ सुरू करुन अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे यासह इतर मागण्या निवेदनात केल्या आहेत़निवेदनावर युवराज वारुळे, विलास सैंदाणे, बापू अहिरे, राजेंद्र सोनवणे, अमृत महाले, भटू सूर्यवंशी, राजेश महाले, छोटू सोनवणे, सुनील सैंदाणे, धनराज पगारे, विलास देवरे, गोपाल चित्ते, प्रविण वारुडे, योगेश सैंदाणे, नाना वारुडे, आप्पा ठाकरे, लक्ष्मण बोरसे, मनोज ठाकरे आदींच्या सह्या आहेत़
आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:09 IST