७ मोटारसायकली यात एक बुलेट असून ३ लाख पाच हजार किमतीचा मुद्देमाल जप्त डीवायएसपी प्रदीप मैराळे यांनी पोलीस खात्याचे केले कौतुक.
गेल्या काही दिवसांपासून महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठ, बँक, हॉस्पिटल्स, लॉन्स व लग्न समारंभ तसेच पिंपळनेर शहरातील मुख्य रस्त्यांवर मोटारसायकल चोरीस गेल्याच्या घटना घडत होत्या. १२ जुलै रोजी एमएच १५- जीजे ४४४० क्रमांकाची बुलेट चोरीला गेली होती. त्याचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल येत होता. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांना दुचाकी चोरांबाबत माहिती मिळाली. त्यांनी शहरातील संशयित आदु उर्फ यादया रमेश देसाई (रा. लोणेश्वरी भिलाटी पिंपळनेर ) व अजय उर्फ आज्या शिवाजी गांगुर्डे (रा.मल्याचापाडा) हे मोटार सायकल चोरी करून कमी किमतीत विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत खाकीचा धाक दाखविताच त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून ७ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यात एक बुलेट आहे. आरोपी हे गाडी चोरीत व तिचे स्पेअरपार्ट मोकळे करण्यात तरबेज आहे. गाडीउघडण्याची व चोरी करण्याची माहिती यूट्यूब वरील व्हिडिओ पाहून शिकलो असल्याची कबुली पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हा शाखेचे शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके, पोलीस पथक पोहेकॉ. प्रवीण अमृतकर, पो.ना. देवेंद्र वेन्दे, पो.कॉ.रविकुमार राठोड, पो.कॉ. मकरंद पाटील, पो.कॉ. भूषण वाघ, पो.कॉ. ग्यानसिंग पावरा, दीपक माळी, यांनी केली. या पथकाचे डीवायएसपी मैराळे यांनी कौतुक केले आहे.