शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवस्तीतील पार्किंगच्या अडचणीत आता ‘जाळ्यां’ची सर्वाधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:09 IST

आग्रा रोडवरील स्थिती : सर्वसामान्य वाहनधारकांसह व्यापाºयांनाही नाहक सहन करावा लागतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : इथे आपले वाहन लावू नका, दिसत नाही का जाळी टाकलीय, तुमचे वाहन पुढे लावा असे एक ना अनेक अनुभवांना सर्व सामान्य नागरीकांना सामोरे जावे लागत आहे़ ग्राहकांना दुकानांमध्ये जाण्यासाठी मार्ग मिळावा याकरीता दुकानदारांकडून रस्त्यावर जाळ्या टाकल्या जात आहेत़ परिणामी वाहनचालकांची अडचण होत आहे़ याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला आग्रा रोडवर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची खरेदीसाठी ये-जा सुरु असते़ या नागरीकांना नेहमीच वाहतुक कोंडीसह पार्किंगचा प्रश्न सतत भेडसावत असतो़ मध्यवर्ती  पेठांमध्येच शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने मुळातच अरुंद आणि निमुळत्या रस्त्यांवर वाहने अस्ताव्यस्त लावल्याने वाहतुकीची कोंडी होत असते़ त्यातच दुकानदार दुकानांसमोर लोखंडी जाळ्या टाकन ठेवतात़ मुळातच या भागात पार्किंगचा प्रश्न बिकट बनलेला आहे़ दुचाकीचालकांना वाहने लावायला जागा मिळत नाही़ बरेच लांबवर आपले वाहन लावून खरेदीसाठी फिरावे लागते़ दुकानदारांकडून रस्त्यावर टाकण्यात येत असलेल्या जाळ्यांच्या जागेवर दुचाकी लावण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते़ मात्र, काही दुकानदारांची अरेरावी सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे़ त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरीकांना तर त्यांची वाहने लावायची कुठे? असा प्रश्न पडतो़ त्यांना फार लांबवर चालणेही शक्य होत नाही़ वास्तविक वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा हा प्रकार आहे़ हा देखील एक प्रकारे अतिक्रमणाचा मुद्दा आहे़ हा गंभीर असा मुद्दा आहे़ महापालिका प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे़ असे झाल्यास उदभवणारे वाद थांबविता येऊ शकतील़ प्रशासनाचे दुर्लक्ष कशासाठी?वाहतूक पोलिसांनी बºयाच रस्त्यांवर पार्किंगबाबत धोरण आखले आहे़ महापालिकेकडून पार्किंग पट्टे मारण्यात आलेले आहेत़ मात्र, नागरिक कधी-कधी या पट्ट्याच्या बाहेर आपली वाहने उभी करतात़ हे देखील चुकीचे असून त्यामुळे बºयाचदा त्यांचीच अडचण होते. दुकानदारांकडून जाळ्या टाकताना आमच्या दुकानात येण्यासाठी रस्ताच नाही़ तेथे जाळी ठेवली नाही तर ग्राहकांना लांबून वळसा घालून यावे लागते़ दुकानाबाहेर जाळी टाकल्याने परिणामी त्यांची गैरसोय यामुळे दूर होते, अशी कारणे दुकानदारांकडून देण्यात येत आहेत़ याअनुषंगाने आता महापालिका प्रशासनाकडून नेमके कोणते धोरण आखले जाते,  याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे