शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष बागायतदारांचे अडकलेले पैसे परत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:50 IST

सटाणा : केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  सटाणा परिसरातील द्राक्ष बागायतदारांचे तब्बल ६ कोटी रूपये दिल्लीतील व्यापाºयाकडे अडकले होते. ते मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. अखेर केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची भेट घेऊन त्यांनी साकडे घातले. त्यानुसार डॉ.भामरे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले व शेतकºयांना त्यांचे पैसे नुकतेच परत मिळाले. सटाणा परिसरातील ९० द्राक्ष बागायतदारांचे दिल्ली येथील रोहितकुमार अ‍ॅड. जतीन कुमार या व्यापाºयाकडे द्राक्षांचे रुपये ६ कोटी घेणे होते. बरेच प्रयत्न करूनही हा व्यापारी त्यांचे पैसे देत नव्हता. आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांची या फसवणुकीमुळे अतिशय दयनीय परिस्थिती झाली होती. ह्या सर्व ९० द्राक्ष बागायतदारांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्याकडे मांडली. डॉ. भामरे यांनी नाशिक पोलीस महासंचालक दिघावकर व नाशिकचे पोलीस अधीक्षक दराडे यांच्या सहकार्याने दिल्ली येथील व्यापाºयाकडे हे अडकलेले पैसे वसूल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून सर्व ९० द्राक्ष बागायतदारांना त्यांचे अडकलेले ६ कोटी रूपये नुकतेच परत मिळाले आहेत. त्या निमित्त या द्राक्ष बागायतदारांचे प्रतिनिधी खंडेराव शेवाळे, बापू महादू खैरनार, दगा नारायण वाघ, जिभाऊ कापडणीस. अरुण गुरुजी वाघ, तुषार कापडणीस, राजू मांडोळे, युवराज कापडणीस, अभिमान जाधव इ. यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांना द्राक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, यावेळी मंत्री डॉ़ भामरे यांनी शेतकºयांशी हितगुज देखील साधण्याचा प्रयत्न केला़ 

टॅग्स :Dhuleधुळे