शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

पाठय़पुस्तकांऐवजी पैसे खात्यावर

By admin | Updated: January 16, 2017 00:38 IST

धुळे : पहिली ते आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याना देण्यात येणा:या मोफत पाठय़पुस्तकांऐवजी त्याची रक्कम थेट विद्याथ्र्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे

धुळे : पहिली ते आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याना देण्यात येणा:या मोफत पाठय़पुस्तकांऐवजी त्याची रक्कम थेट विद्याथ्र्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विद्याथ्र्याची बँक खाती उघडण्याची सूचना राज्यस्तरावरून शिक्षणाधिका:यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व खाजगी अनुदानित शाळेतील पहिली ते आठवी सर्व विद्याथ्र्याना मोफत पाठय़पुस्तके देण्यात येतात. आतार्पयत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये या विद्याथ्र्याना नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात येत होते. जून 2017 पासून या पाठय़पुस्तकांचा निधी थेट विद्याथ्र्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खातेलाभार्थी सर्व विद्याथ्र्याची राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत...तर मुख्याध्यापक जबाबदारजर बँक खाते न उघडल्यामुळे लाभापासून वंचित राहिल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. शासनाने विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तू स्वरूपात मिळणा:या लाभाचे हस्तांतर रोख स्वरूपात थेट लाभाथ्र्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.आधार कार्ड लिकिंगविद्याथ्र्याच्या बँक खात्याशी आधार लिकिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत सर्व विद्याथ्र्याचे बँकेमध्ये खाते नाहीत. कोणत्याही योजनेचा लाभ देण्यापूर्वी विद्याथ्र्याचे बँकेमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे. त्यानंतरच लाभ देण्याची प्रक्रिया राबविता येणार आहे. यासाठी विद्याथ्र्याचे राष्ट्रीयकृत, शेडय़ुल्ड बँक किंवा ग्रामीण बँकेमध्ये ङिारो बॅलन्सवर खाते उघडणे आवश्यक आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने 11 जानेवारी रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी, मनपा प्रशासन अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांना आदेश देण्यात आले आहेत.शिक्षकांचा होणार ताण कमीलाभाथ्र्याच्या खात्यात थेट पैसे वर्ग झाल्यामुळे शिक्षकांचा ताण कमी होणार आहे. कारण शिक्षकांना तालुक्याच्या ठिकाणाहून पुस्तके आणून शाळेवर पुस्तकांचे वाटप करावे लागते. तसेच गणवेशासाठीही खूप धावपळ करावी लागते.पहिल्या दिवशी पुस्तकांचे काय?सर्व शिक्षा अभियान अंतर्गत आतार्पयत शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये नवीन पुस्तके व आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्र्याना गणवेशाचे वाटप करण्यात येते. परंतु निधी जरी विद्याथ्र्याच्या खात्यावर जमा केला तरी ग्रामीण भागातील पालक विद्याथ्र्याना पहिल्या दिवशी पुस्तके घेऊन देतील का? याबाबतही शंका आहे.ङिारो बॅलन्स खात्याची अडचणङिारो बॅलन्सची खाती राष्ट्रीयकृत बँक बराच दिवस व्यवहार नाही झाल्यास बंद करतात. यामुळे शिक्षकांना या विद्याथ्र्याची खाती पुन्हा उघडावी लागतात. त्यामुळे बँकांना विद्याथ्र्याची ङिारो बॅलन्सची खाती बंद न करण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा शिक्षकवर्गाकडून करण्यात येत आहे.अडीच लाख विद्याथ्र्याची बँक खातीयासाठी जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या 2 लाख 42 हजार विद्याथ्र्याची खाती उघडावी लागणार आहेत. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील 89 हजार 519 विद्याथ्र्याना मोफत गणवेशाचेही पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. सर्वच्या सर्व विद्याथ्र्याची जूनर्पयत खाती उघडण्यासाठी खूप कसरत करावी लागेल.4तसेच शासनाकडून विद्याथ्र्याच्या खात्यावर निधी वेळेवर देणे गरजेचे आहे. जर निधी वेळेवर जमा नाही केला तर विद्याथ्र्याना वेळेवर पैसे मिळू शकणार नाही. गरीब पालकांच्या पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये रांगा लागतील.पाठय़पुस्तकांचा निधी विद्याथ्र्याच्या थेट खात्यावर जमा होणार असल्याने सर्व मुख्याध्यापकांना विद्याथ्र्याची बँक खाते उघडण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करावयाची आहे.                         -मोहन देसले,           प्राथमिक शिक्षणाधिकारी