मोहाडी प्र. डांगरी : धुळे तालुक्यातील मोहाडी प्र. डांगरी येथे नुकतेच ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षातील विद्यार्थी प्रांजल प्रमोद पाटील व प्रतीक संभाजी पवार ह्या कृषिदुतांमार्फत आयोजित करण्यात आली होती.
प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे कृषिदूत प्रांजल पाटील व प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश हाडोळे, वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अभिमन राठोड आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेला मोहाडीसह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी मोहाडीचे उपसरपंच विलास गुजर, रवी पाटील, भीमराव पाटील, दीपक गुजर, अविनाश खैरनार, राजू पाटील, बापू सोनजे, विलास खैरनार, आबा नांदरे, रिंकू पाटील, सुभाष पाटील, भूषण सूर्यवंशी, शिल्पन गुजर तसेच कुरवेल (ता. चोपडा) येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
110921\img20210819103052.jpg
ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रकल्प अंतर्गत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करतांना कृषिदूत प्रांजल पाटील