शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी पोलिसांनी पकडला गुरांचा ट्रक, चालक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 22:16 IST

मुंबई-आग्रा महामार्ग : लळींग शिवारातील घटना

धुळे : ट्रकमध्ये म्हशींना निर्दयीपणे बांधून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकला मोहाडी पोलिसांच्या पथकाने लळींग गावाजवळच पकडले़ म्हशींसह १० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ ही कारवाई रविवारी दुपारी झाली़ याप्रकरणी चालकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे़एमएच १८ एम ३९६५ क्रमांकाचा आयशर ट्रक हा मुंबई आग्रा महामार्गावरुन धुळे मार्गे मालेगावच्या दिशेने जाणार आहे़ त्यात म्हशी बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांना मिळाली़ माहिती मिळताच त्याची खातमजमा करुन लळींग घाटात गावाजवळ सापळा लावण्यात आला़ माहिती मिळालेला ट्रक मालेगावच्या दिशेने जात असल्याचे कळताच तो थांबविण्यात आला़ चालकाकडे चौकशी केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले़ ट्रकची कसून तपासणी केल्यानंतर त्यात काळ्या रंगाच्या गावरान जातीच्या १३ म्हशी निदर्यतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या़ वाहनात वाहन क्षमतेपेक्षा जास्त गुरे भरुन कत्तलीसाठी घेऊन जाताना हे वाहन मिळून आल्याने मोहाडी पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात घेतला आणि म्हशींची सुटका केली़याप्रकरणी पोलीस कर्मचारी कांतीलाल भगवान शिरसाठ यांनी १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार आयशर ट्रकवरील चालक फिरोज चांद पठाण (३८, रा़ बोलठाण ता़ नांदगाव जि़ नाशिक) याच्या विरोधात फिर्याद दाखल झाल्याने महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस कर्मचारी दराडे करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे