शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

ंग्रामीण भागात आधुनिक युगातही रेडीओला सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:22 IST

पारांवर चर्चेत आकाशवाणीचा सहभाग; लोडशेडींग काळात रेडीओचा वापर

रावसाहेब चव्हाण ।तºहाडी : आधुनिक युगात देश तंत्रज्ञानात प्रगती करत असतांना अनेकजण आपल्या मोबाईलवर चॅनल बातम्या, ई पेपर आदिंच्या माध्यमातून माहितीची देवाण - घेवाण करत असतांना व सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक घटना क्षणात कळते. परंतु आजही ग्रामीण भागाच्या चावडी, पारावर गल्ली बोळात बसलेले वृध्द आज रेडीओच्या माध्यमातून माहिती मिळवून चर्चेला उधाण येत आहे. त्यामुळे अडगळीत पडलेल्या रेडीओला सुगीचे दिवस आले आहे.रेडीओला फारशी किंमत नसायची शिवाय खर्चही कमी, शिवाय सोबत ठेऊन आपल्याला हवे तेव्हा स्टेशन पकडून बातम्या ऐकणे किवा ईतर मनोरंजन कार्यक्रम ऐकायचा अनेकाना छंद जणु जडला होता. जनावरांमागे शेतात जाणाऱ्या शेतकरी, जनावरे संभाळतांना रेडीओ सोबत ठेवून मनोरंजन करून घेत. शिवाय कधी कधी खेड्यापाड्यात विजेचा प्रश्नही असायचा म्हणून कमी खर्चातील सेलवर ही तहान भागवता येत होती.आता वृत्तपत्रासह, दुरदर्शन संचासह अनेक जलद साधने प्राप्त झाली. काही क्षणात कोठलीही माहिती सहज उपलब्ध प्राप्त होते. परंतु आपल्याला ज्या बाबीची सवय असते किवा जे सोईचे वाटते त्या माध्यमाचा वापर करुन गरज भागविण्याची सवय जास्तीत जास्त लागल्या आहे. परंतु या मनोरंजनात्मक राजकिय खेळाची आवड कुणाला नसणार हे बातम्यातून लेखाजोखा घेताना आढळले.शंभरी ओलाडलेले आनंदा गायकवाड म्हणाले की, दररोज बातम्या न चुकता चावडी चावड़ीवर, पारा पारावर, किंवा जमेल तेथे ऐकतो. आमच्या शेवटाच्या आयुष्याच्या शेवटी अनेक मर्यादा, अडीअडचणी आहे. परंतू त्या स्थितीवर मात करीत अवती भोवतीच्या बाबीचा आढावा घ्यायला आवडते. आणि सध्या तर आवडीनुसार लक्ष घालणे आलेच. ऐकायला कमी येते, पाहिजे तसे उमजत नाहित, शिवाय नविन राजकिय पक्ष, नवनविन उमेदवार पोरांची अवघड नावे. परंतु आम्ही पार लालबहादुर शास्त्रीजी पंतप्रधान असताना पासून निवडणुका बघत आलो. आताही पहातोय परंतू तेव्हाची पद्धत फार वेगळी होती. मग ती प्रचाराची असो की मतदानाची असो. एवढ्या खर्चाच्या गोष्टी पूर्वी नव्हत्या, असेही त्यानी सांगितले. एवढे मात्र खरे की या जुन्या पिढीला ज्ञान, माहिती देणाºया रेडीओला मात्र सुगीचे दिवस आले हे खरे.

टॅग्स :Dhuleधुळे