शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट गुरांची पोलीस चौकीबाहेर ‘दबंगगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 22:48 IST

धुळे शहर : शासकीय कार्यालयाबाहेर आता मोकाट गुरांचा वावर ; मनपाचा कारवाईचा केवळ ‘देखावा’

धुळे : शहरात मोकाट गुरांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे़ महापालिका केवळ कारवाई सोंग केल्याची भूमिका घेत आहे़ शनिवारी रात्री मोकाट गुरांनी एकत्र येवून पाच कंदिल चौक परिसरात असलेल्या शहर पोलिस चौकी बाहेर दंबगिरी करतांना ‘लोकमत’ च्या सर्वेक्षणात दिसून आले़़शहरातील मुख्य रस्ता, चौक, बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे मोकाट गुरांचा ठिय्या बसलेला असतो़‘लोकमत’ शनिवारी रात्री शहरातील आग्रारोड, पाच कंदील, कमलाबाई हायस्कूल चौक, सिग्नल चौक, महात्मा गांधी चौक अशा परिसरात पाहणी केली असता, ठिकठिकाणी मोकाट गुरे ठिय्या मांडून बसल्याचे दिसून आले. आग्रारोड, संतोषी माता चौकात भाजीपाला विक्रेत व्यवसाय करतात़ रात्री उरलेला भाजीपाला त्याच जागी फेकतात त्यामुळे अशा ठिकाणी मोकाट गुरांचा वावर अधिक असतो.धुळेकरांसह अधिकाऱ्यांना त्रासशहरात मोकाट गुरांवर कारवाई केली जात नाही़ पशुपालक गुरांना रस्त्यावर सोडून देतात. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारबाहेर मोकाट गुरांनी ट्यिंा मांडून अधिकाऱ्यांचा रस्ता अडविला होतो. तरीही कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे.पोलीस चौकीबाहेर ठिय्याशनिवारी आग्रारोडवर फिरणाºया ५ ते ६ मोकाट गुर एकत्र येऊन त्यांनी पाच कंदील चौक परिसरात असलेल्या पोलीस चौकीकडे आपला मोर्चा वळविला. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चौकीवर पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने चार गुरांनी पोलीस चौकीबाहेरचं ठिय्या मांडला होता़ तर एका गुराने दरवाजा समारे येवून हबरडा फोडला़ मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्याने चौकीबाहेर बसणेच पसंत केले.अनेकांनी व्यक्त केले आश्चर्यऐरवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाºयांना बघितले जाते. मात्र शनिवारी रात्री मोकाट गुरांनी शहर पोलीस चौकीबाहेर करणारा ठिय्या मांडलेला बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

टॅग्स :Dhuleधुळे