शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जमावाकडून वाहनाची तोडफोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत असताना मात्र शुक्रवारी गायीच्या वासरुचीच चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता़ पण, नागरिक आणि वासरुचे मालक यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला़ संतप्त जमावाकडून मात्र वाहनाची तोडफोड झाली़ शहरातील चाळीसगाव रोड भागात असलेल्या शंभर फुटी रोडवर असलेल्या पूर्व हुडको भागात  शुक्रवार ४ ...

ठळक मुद्देशंभरफुटी रोडवरील घटना वासराची चोरी रोखली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत असताना मात्र शुक्रवारी गायीच्या वासरुचीच चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता़ पण, नागरिक आणि वासरुचे मालक यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला़ संतप्त जमावाकडून मात्र वाहनाची तोडफोड झाली़ शहरातील चाळीसगाव रोड भागात असलेल्या शंभर फुटी रोडवर असलेल्या पूर्व हुडको भागात  शुक्रवार ४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रस्त्यावर कोणीही नसल्याचे पाहून एक चार चाकी वाहन थांबले़ त्यातून तीन जणांनी वाहनाच्या खाली उतरुन गायीचे वासरु चोरण्याचा प्रयत्न केला़ ही बाब लक्षात येताच आरडा-ओरड सुरू झाली़ गल्लीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता या तिघांनी वाहन सोडून पळ काढला़ गायीचे वासरु चोरीचा प्रयत्न सतर्क नागरिकांनी हाणून पाडला़ वासरु चोरुन घेऊन जाण्यासाठी ज्या वाहनाचा उपयोग करण्यात येणार होता ते एमएच ०६ एएफ ४७८९ क्रमांकाचे वाहनाची संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आली़ यावेळी वातावरण अधिकच गंभीर झाले होते़  या घटनेची माहिती पूर्व हुडको भागात राहणारे दीपक रामकृष्ण वाघ यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिली़ त्यानुसार अज्ञात तीन जणांविरुध्द फिर्याद नोंदविण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तडवी करीत आहेत़