शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात आमदारांना पाठिंबा जाहीर करताच मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:38 IST

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संतप्त : आमदारांच्या वादग्रस्त कामांना विरोध करणार असल्याचा सोशल मिडीयावर पवित्रा

ठळक मुद्देमनसेने आमदाराच्या आंदोलनाला पाठींबा दिलानिर्णय घेतांना विश्वासात घेतले नाहीपक्षाच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केलेल्या माझं शहर बदलतयं या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता मनसेतील अंतर्गत धुसफूस सोशल मिडीयावरच चव्हाट्यावर आली आहे़ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आमदारांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे़  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी आमदार अनिल गोटे यांच्या ‘माझं शहर बदलतयं’ या आंदोलनाला पाठिंबा दिला़ मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शहराध्यक्ष डॉ़ मनिष जाखेटे यांनी व्यासपीठावर जाऊन विकास कामांसाठी आमदारांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले़मात्र त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह अन्य पदाधिकाºयांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे़ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे केंद्र व राज्य सरकारवर तोफ डागत असतांना धुळयात मनसे भाजपच्या आमदारास पाठिंबा कसा दिला जातो? आमदार अनिल गोटे दर निवडणूकीत वादग्रस्त मुद्दे काढत ‘पब्लिसिटी स्टंट’ करीत असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आमदारांच्या कामांना विरोध करीत आहे़ पण असे असतांनाच मनसेच्या पदाधिकाºयांनी एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी विश्वासात न घेता अचानक आमदारांच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा कितपत योग्य आहे? असा प्रश्न मनविसेने उपस्थित केला आहे़  जर पक्षाचे धोरणात्मक निर्णयही विश्वासात न घेता होणार असतील तर मनसैनिकांनी पक्षात का राहावे? असा प्रश्नच काही पदाधिकाºयांनी सोशल मिडीयावर उपस्थित केला आहे़ तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आमदारांना पाठिंबा नाही, असेही स्पष्ट   केले आहे. तसेच  आज आमदारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, उद्या पक्षही त्यांच्या पक्षात विलीन कराल का? असा प्रश्न मनविसेने स्वपक्षाच्या पदाधिकाºयांना सोशल मिडीयावर विचारला आहे़आता या बाबतीत पक्षाकडून काय भुमिका घेतली जाते हे महत्वाचे ठरेल़मनसेचे अन्य पदाधिकाºयांमध्येही नाराजीकार्यक्रमांना न बोलाविणे, परस्पर निर्णय घेणे, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न न करणे अशा अनेक मुद्यांवरून मनसेत अंतर्गत नाराजीनाट्य सुरू आहे. मात्र आता थेट आमदारांच्या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिल्याचे जाहीर झाल्यानंतर यावर काही पदाधिकाºयांनी सोशल मिडियावरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत या निर्णयाला एकप्रकारे उघडपणे विरोध केला आहे. सोशल मिडियावरुन दिवसभर यावर मेसेज फिरत होते.