शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

धुळयातील पांझरा चौपाटीबाबत आमदारांचा आरोप निराधार-डॉ़ सुभाष भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 11:44 IST

जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, न्यायालयाच्या आदेशाने झाली कारवाई

ठळक मुद्दे- आमदारांनी केलेला आरोप म्हणजे अज्ञानातला आनंद- पांझरा चौपाटीशी आपला काडीमात्र संबंध नाही- शहरातील विकास कामांसाठी प्रयत्नशिल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आमदार अनिल गोटे यांनी ‘माझं शहर बदलतयं’ या आंदोलनात पांझरा चौपाटी आपण पाडल्याचा आरोप केला असून तो पूर्णपणे निराधार, तथ्यहीन, खोटा व धुळेकर जनतेची दिशाभूल करणारा आहे, असा खुलासा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी केला आहे़           मुळातच पांझरा चौपाटी बद्दल जो काही वाद आहे. तो उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू होता़ उच्च न्यायालाच्या आदेशाप्रमाणे स्थानिक प्रशासनाने पांझरा चौपाटीवर कार्यवाही केलेली आहे. तरी देखील  संरक्षण राज्यमंत्री यांचा पांझरा चौपाटी पडण्याशी संबंध आहे असा आरोप करणे म्हणजे अज्ञानातला आनंद आहे, असे डॉ़ भामरे यांनी म्हटले आहे़  पांझरा चौपाटीच्या वादाशी आपला काहीही संबंध नसून या वादात पडण्याचे आपल्याला काहीही कारण नाही़ आपले मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ कनोली उपसा सिंचन योजना,  अमृत योजनेतून आलेल्या पाणीपुरवठा, भूमिगत गटार, रेल्वे स्थानकाचे प्रश्न, शहरातील मुलभूत सोई सुविधांसाठी त्यात गजानन कॉलनीतील संरक्षण भिंत या विकास कामांसाठी प्रयत्न सुरू आहे़ त्यामुळे चौपाटी पाडली, पांझराकाठचे रस्त्यांचे काम थांबविण्यासाठी प्रयत्न केले या आमदारांच्या तथ्यहीन आरोपांकडे दुर्लक्ष करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले आहे़