शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

आमदार अनिल गोटे दुपारी भूमिका जाहीर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:38 PM

महानगर अध्यक्षांनी भेट घेऊन केली अर्धा तास चर्चा, फलित गुलदस्त्यात 

ठळक मुद्देमहानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी घेतली आमदार अनिल गोटेंची भेट प्रसिद्धी माध्यमांना दिला सस्मित फोटो, काय ठरले याबाबत उत्सुकता दुपारी भूमिका जाहीर करणार; आमदार गोटेंची माहिती

लोकमत आॅनलाईन धुळे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारकीच्या राजीनामा देण्याच्या घोषणेनंतर प्रदेश पक्षश्रेष्ठींशी सोमवारी रात्री चर्चेनंतर आमदार अनिल गोटे सकाळी शहरात परतले. नऊ वाजेच्या सुमारास महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत बंदद्वार चर्चा केली. परंतु नेमकी काय चर्चा झाले, काय ठरले याबाबत दोघांनीही बोलण्याचे टाळले. आमदार गोटे यांनी मात्र दुपारी २ वाजता आपली भूमिका जाहीर करू, असे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीचे नेतृत्व व गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये या मुद्यांवर विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा शहराचे आमदार अनिल गोटे यांनी केली होती. मुंबईत पोहचल्यानंतर आधी मुख्यमंत्र्यांशी व दुस-या दिवशी सोमवारी रात्री प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चेनंतर ते आज शहरात दाखल झाले. निवडणुकीत नेतृत्व व गुन्हेगारांना उमेदवारी नाही, या मुद्यावर तडजोड करणार नसल्याचे आमदार गोटेंनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सोमवारी रात्री बैठकीत काय झाले, काय ठरले याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांतही प्रचंड उत्सुकता आहे. पक्षाचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी आज सकाळी आमदार गोटे यांच्या निवासस्थानी पोहचले. तेथे दोघांमध्ये अर्धा ते पाऊणतास बंदद्वार चर्चा झाली. त्यानंतर बाहेर येऊन घराच्या ओट्यावर उभे राहून दोघांनी प्रसिद्धी माध्यमांना सस्मित छायाचित्र दिले. पण त्यानंतर महानगर अध्यक्ष अग्रवाल वाहनातून निघून गेले. तर आमदार गोटे हे त्यांच्या कल्याण भवनातील निवडणूक प्रचार कार्यालयात पोहचले. तत्पूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना, काय चर्चा झाली, काय ठरले याबाबत विचारले असता त्यांनी दुपारी २ वाजता आपण भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे रात्रीच्या बैठकीत काय ठरले, आज सकाळी आमदारांच्या निवासस्थानी काय चर्चा झाली, या बाबी अद्याप तरी गुलदस्त्यात आहेत. दरम्यान नामनिर्देशन पत्र भरण्याची आज शेवटची मुदत असल्याने पक्षाच्या दोन्ही कार्यालयांमध्ये आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नेहमीसारखीच गर्दी झाल्याचे चित्र आहे. उमेदवार, त्यांचे समर्थक अर्ज भरताना काही त्रूटी राहू नये, याची दक्षता घेत कार्यकर्त्यांच्या मदतीने अर्ज भरण्यात व्यस्त झाले असून आमदार गोटे यांच्या भूमिकेकडेही साºयांचे लक्ष लागून आहे.  

 

टॅग्स :DhuleधुळेPoliticsराजकारण