शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेहेरगावावर शोककळा दोघा मित्रांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:29 IST

शवविच्छेदनावेळी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मंडप धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना धुळे तालुक्यातील नवलाणे शिवारात शुक्रवारी दुपारी घडली़ ही घटना सायंकाळी उजेडात आल्याने ते राहत असलेल्या मेहेरगाव गावावर शोककळा पसरली.धुळे तालुक्यातील मेहेरगाव गावात राहणारे अनिल शिवाजी भामरे (१८) आणि खुशाल शिवाजी भामरे (४१) हे दोघे मित्र आहेत़ अनिल याची शेती असून खुशाल याचा मंडपाचा व्यवसाय आहे़ सध्या लग्न सराई बंद असल्याने मंडप धुण्यासाठी मेहेरगावपासून जवळच असलेल्या नवलाणे शिवारात खुशाल भामरे हा मंडप धुण्यासाठी गेला़ त्याच्यासोबत अनिल हा देखील गेला होता़ मंडप पाण्यात धुत असताना एकाचा तोल गेला़ त्याला वाचविण्याचा प्रयत्न दुसऱ्याने केला़यानंतर नवलाणे गावाचे पोलीस पाटील यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मेहेरगाव येथील अनिल याचा चुलत भाऊ भटू सुरेश भामरे यांना फोनद्वारे माहिती दिली़ माहिती मिळाल्यानंतर तातडीने गावातील मंडळी नवलाणे तलावाकडे धावले़त्यांनी या दोघांचे मृतदेह तलावाच्या बाहेर काढल्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केल्यानंतर त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदन गृहात दाखल करण्यात आले़ त्यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती़

टॅग्स :Dhuleधुळे