धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने खान्देशच्या दौऱ्यावर आहेत़ मंगळवारी ते चाळीसगावकडून धुळ्यात दुपारी उशिरा दाखल झाले़त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बंदिस्त हॉलमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली़ यावेळी या यात्रेत त्यांच्याबरोबर माजी आमदार तथा उपाध्यक्ष अनिल गोटे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, सुरज चव्हाण, सुलक्षणा सलगर, सुनील गव्हाणे, माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी आहेत़जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आगमन झाले़ जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले़ यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री एकनाथराव खडसे सहभागी आहेत़ त्यांनी पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या़
मंत्री जयंत पाटील यांचे धुळ्यात झाले आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 22:49 IST