धुळे : शहराचे आमदार भाजपचे नगरसेवक फोडण्याची भाषा करतात. त्यांनी आधी स्वत:च्या एमआयएमचे किती नगरसेवक तुमच्यासोबत आहेत. याचे आत्मचितंन करावे, असा टोला स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी आमदार डाॅ. फारूख शाह यांना लगावला.साेमवारी महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात स्थायी समितीची साेमवारी सभा घेण्यात आली. यावेळी सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक अमोल मासुळे, संतोष खताळ, कमलेश देवरे, युवराज पाटील, सुनील साेनार, कशीश उदासी, फातेमा अन्सारी आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक कमलेश देवरे म्हणाले की, आमच्या प्रभागात वेळेवर स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य तक्रारी वाढल्या आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रभागात कधी येतात. यासंदर्भात गेल्या सभेत मागणी केली होती. मात्र अद्याप मिळालेली नाही. आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी किमान किमान रस्ते, गटारी पथदिव्यांची सुविधा पुरवाव्यात. नागरिकांचे व भाजपचेे सत्ताधारी नगरसेवकांचे प्रश्न सुटत नसल्याने कदाचित भाजपचे नगरसेवक शहराचे आमदार फारूख शाह यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला असावा, अशी टीका नगरसेवक कमलेश देवरे यांनी केली.
यावेळी सभापती सुनील बैसाणे म्हणाले की, महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. अनेक जण सत्ता परिवर्तनाची स्वप्न पहात आहे. सुरुवातीच्या काळात काहींनी ३५-३६ चा आकडा फिक्स केला हाेता. मात्र असे आकडे नेमके कुठून काढले जातात. याचे मला आश्चर्य वाटते. शहरातचे आमदार फारूख शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे पंधरा नगरसेवक घेऊन या, मी महापाैर बनवितो, असे आवाहन सत्ताधारी नगरसेवकांना केले आहे. मात्र भाजपचे नगरसेवक विकावू नाहीत. त्यांनी महापालिकेवर एमआयएमचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पाहू नये, आधी आपल्या एमआयएम पक्षातील किती नगरसेवक आपल्यासोबत आहेत याचा विचार करावा, असेही सभापती सुनील बैसाणे यांनी आमदार शाह यांना म्हटले आहे.