शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

धुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाखोंची उलाढाल ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:09 IST

उत्पन्नावरही पाणी : व्यापा-यांनी धान्यखरेदी बंद केल्याचा परिणाम

ठळक मुद्देसोमवारपासून व्यापा-यांनी केली धान्यखरेदी बंद ऐन हंगामात शेतकरी अडचणीत लवकरात लवकर तोडगा काढण्याची अपेक्षा 

लोकमत आॅनलाईनधुळे : सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दरात धान्य खरेदी करणा-या व्यापा-यांना शिक्षेच्या तरतुदीच्या निषेधार्थ व्यापा-यांनी चार दिवसांपासून धान्यखरेदीच बंद केली आहे. परिणामी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रोज होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे बाजार समित्यांना मिळणा-या उत्पन्नावरही पाणी फेरले जात आहे. या प्रश्नी तोडग्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, दोंडाईचा, साक्री व शिंदखेडा अशा पाच बाजार समित्या आहेत. सरकारच्या अन्याय धोरणाच्या निषेधार्थ व्यापा-यांनी शेतक-यांनी आणलेल्या शेतमालाची खरेदी बंद केली आहे. परिणामी बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. पावसाळा हा तसा धान्य खरेदी-विक्रीसाठी मंदीचा काळ समजला जातो. तरी येथील बाजार समितीत या दिवसांत रोज २५० ते ३०० क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री होते. त्यामुळे ५ ते ६ लाखांची उलाढाल होते. कमी-अधिक फरकाने सर्व बाजार समित्यांमध्ये हीच स्थिती आहे. त्यामुळे चार दिवसांपासून रोज सुमारे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. खरेदी-विक्री होणा-या शेतमालाच्या किंमतीवर शेकडा १ रुपये अशी बाजार फी आकारली जाते. त्यामुळे दिवसाकाठी या दिवसांतही बाजार समितीला कमिशनपोटी ५ ते ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु चार दिवसांपासून त्यावरही पाणी फेरले गेले आहे. यामुळे या प्रश्नी सरकारने लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :Dhuleधुळे