शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिल कामगाराचा मुलगा झळकणार मराठी पडद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 22:47 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क लहानपणापासून अभिनयाची आवड होती़ त्यामुळे शिक्षणासोबत छंद जोपासत गेलो़ एमबीए शिक्षण झाल्यानंतर पुण्यात ...

ठळक मुद्देकुंटूबासोबत एकत्र पाहण्यायोग्य चित्रपटचित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीलारहस्याचा शोध घेणारा अनुभवाचा एक प्रवास..८० टक्के चित्रीकरण तोरणमाळ येथे

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कलहानपणापासून अभिनयाची आवड होती़ त्यामुळे शिक्षणासोबत छंद जोपासत गेलो़ एमबीए शिक्षण झाल्यानंतर पुण्यात चित्रपटात काम करण्यासाठी पहिल्यांदा आॅडिशन दिली़ त्यात माझी निवड झाल्याने मला रहस्य या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका करण्याची संधी मिळाली़ एखाद्या गोष्टीची मनात जिद्द, चिकाटी व इच्छा शक्ती असेल तर काहीही शक्य करता येवू शकते़ असे मत अभिनेता लकी बडगुजर यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़प्रश्न : रहस्य या चित्रपटात टायटाय गाणे कोणी गायल आहे व काय सांगाल?उत्तर: हिंदी गाण्याप्रमाणे मराठी चित्रपटातील गाण्यांना देखील मोठ्या प्रमाणात आजही पसंती आहे़ लवकरच राज्यातील १५० चित्रपट गृहात प्रदर्शित होणाऱ्या रहस्य चित्रपटाचे टायटल गाणे मराठी गाण्यांची ओढ असलेल्या सुप्रसिध्द गायिका सुनिधी चौहान यांनी गायले आहे़प्रश्न : किती खर्चातून रहस्य हा चित्रपट पडद्यावर झळकणार आहे ?उत्तर: नंदूरबार येथील भावेश पाटील हे चित्रपटाचे डायरेक्टर आहे. त्या यापूर्वी बळीराजा, नियत, गेमओव्हर, चाबुक अशा चार लघू चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता त्यांचा रहस्य हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे़ या चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण तोरणमाळ येथे झाले आहे़ त्यासाठी सुमारे १ कोटी ३० लाख रूपये खर्च आला आहे़प्रश्न : यापूर्वी तुम्ही कोणत्या चित्रपटात अभिनय केले आहे ?उत्तर: मॉडलिंग, फोटोग्राफी तसेच अभिनयाची आवड होती़ यापुर्वी शॉट फिल्म मध्ये अभिनय केले आहे़ मात्र पहिल्यांदाच रहस्य या मराठी चित्रपटात अभिनेत्याची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे़ या चित्रपटात इंटरटेनमेंट, हॉरर दृश्ये आहेत़ शिवाय कुंटूबासोबत एकत्र चित्रपट पाहण्या योग्य आहेत़घडणाºया रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं दडलेलं रहस्य हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. या चित्रपटात खान्देशातील लकी बडगुजर, राकेश बागुल, स्वाती पाटील, ऋतुजा सोनार, स्वाती शुक्ला आदी कलाकार भूमिका साकारत आहेत़ तर या चित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची आहे.रहस्याचा शोध घेणारा अनुभवाचा एक प्रवास...प्रत्येक नवी रात्र ही रहस्याला जन्म देत असते. अशाच एका रहस्याचा शोध घेण्याच्या प्रवासाचा थरारक अनुभव देणारा भावेश प्रोडक्शन्सचा हा चित्रपट आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच चित्रपट प्रदर्शित होण्या आधी कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा पोस्टर अनावरण झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे