शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचे भाव अल्प तर पशुखाद्यांचे भाव गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:57 IST

मालपूर परिसर : दुग्ध व्यवसाय संकटात; चारा व पाण्याची देखील टंचाई

मालपूर : पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असून दुधाचे भाव अल्प झाले आहेत. यामुळे मालपूर येथील नावारुपाला असलेला दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. परिसरात चारा व पाण्याची देखील टंचाई भासत आहे.शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील दुग्ध व्यवसाय जिल्ह्यात नावारुपाला आहे. मात्र सध्या पशुखाद्याचे वाढत चालले भाव चारा व पाणी टंचाईमुळे संकटात सापडला असून हा व्यवसाय देखील परवडेनासा झाल्यामुळे अनेक कुटुंबांचा उपजिविकेचा प्रश्न उभा राहिला आहे.सरकी ढेप पोत्याची किंमत १३०० वरुन १८५० रुपयांपर्यंत पोहचल्यामुळे आता पशुंना खाऊ घालावी का नाही हा प्रश्न निर्माण होतो. तुलनेत दुधाचे भाव अत्यल्प असल्यामुळे परिणामी चारा, पशुखाद्य आदींचा खर्च जाता हातात काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे उपजिविकेचा प्रश्न उभा राहिला आहे.सरकी ढेप पोते ६० किलोला १८५० रुपये, गुलटन ४० किलो पोते ९०० रुपये, तुंवरदाण ५० किलो ११५० रुपये, उडीददाण ५० किलोला ११५० रुपये, मका भुसा सुमारे प्रतिकिलो ६ ते ७ रुपये आदी पशुखाद्यांच्या सध्या किंमती असून दुधाऐवजी याचा भाव गगनाला पोहचल्याचे पशुपालक सांगतात.दुधाचे भावमालपूर येथे दुधाला फॅटप्रमाणे भाव दिला जातो. गायीच्या दुधाला ४.० फॅटला २५ रुपये लिटर, ३.०४ फॅटला २२ रुपये तर ३.०ला २२ रुपये असा भाव देत असल्ळाचे पशुपालक सांगतात. म्हशीचे दूध डेअरीवर न देता प्रत्यक्ष गावात बंदीने विक्री होत असल्याचे दिसून येते. पशुपालक व ग्राहक यांच्यातला तिसरा घटक डेअरी बाजुला करावा लागतो तरच म्हशीचे दूध विक्रीस परवडते अन्यथा नाही.सध्या मालपूरसह परिसात भिषण दुष्काळी परिस्थिती असून चारा, पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पैसे देऊन चारा मिळत नसल्याचे संकट पशुपालक सांगतात.मध्यप्रदेश, सातपुडापर्वत रांगाच्या पायथ्याजवळून येथील पशुपालक चारा आणत आहेत. येथेही टंचाई असून शोधाशोध करुन किंमती भावाने चारा खरेदी करुन आणावा लागत असून याचा खर्च देखील उत्पन्नापेक्षा जास्त असल्यामुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे.हिरवा चारा व कोरडा चारा यांचे योग्य प्रमाण पशुंना द्यावे लागते. मात्र हिरवा चारा पुरेसा कुठेच उपलब्ध नसल्यामुळे याचा दुधावर परिणाम होत आहे.चारा कसदार असेल व ढेप गुलटनचे योग्य प्रमाण असेल तरच दुधाळ जनावरे योग्य प्रमाणात दुध देतात. चारा, ढेप, गुलटनच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे मालपूर येथील दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे