शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:49 IST

दिलासादायक : आतापर्यंत ९२ रुग्ण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील गल्ली क्रमांक चार येथील रहिवासी असलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने व २८ वर्षीय आईने कोरोनावर मात केली आहे.कोरोनामुक्त झालेल्या मायलेकांवर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर बुधवारी त्यांना हिरे महाविद्यालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला़यावेळी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिक्षक राजकुमार सुर्यवंशी, समन्वयक डॉ. दिपक शेजवळ, डॉ. निर्मलकुमार रवंदळे यांच्यासह इतर डॉक्टर, नर्स, ब्रदर्स आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते़धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ त्यात हिरे वैद्यकीय महाविद्यायातील वैद्यकीय टीमने ८४ रुग्णांना बरे करुन घरी सोडले आहे तर शहरातील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि ब्रदर्सच्या पथकाने कोरोना झालेल्या आठ रुग्णांना बरे केले आहे़धुळे जिल्ह्यासाठी बुधवार एक प्रकारे कोरोनामुक्त दिवस ठरला़ दिवसभरात एकही रुग्ण पॉझीटीव्ह आढळला नसल्याने दिलासा मिळाला़दरम्यान, बुधवारी एकूण ३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यातील आठ संशयित रुग्णांचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ इतरांना लक्षणे नसल्याने घरी पाठविण्यात आले आहे़ क्वारंटाईन कक्षात दोन संशयित रुग्ण दाखल आहेत़ ३३ रुग्णांच्या तपासणी अहवालाची प्रतिक्षा आहे़बुधवारी मायलेकाला सुटी देताना टाळ्यांचा गजर झाला त्यावेळी वातावरण भावुक झाले होते़ मायलेकाने कोरोना योध्द्यांच्या रुग्णसेवेचे कौतुक केले़४धुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आरोग्य विभागाने जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करण्याचे काम सुरू ठेवले आहे़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय तसेच शहरातील जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू असून दोन्ही रुग्णालयाच्या कोरोना कक्षात दाखल ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ येथील डॉक्टर, नर्स, ब्रदर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी अखंडपणे सुरू ठेवलेल्या रुग्णसेवेचे कौतुक होत आहे़ धुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल़

टॅग्स :Dhuleधुळे