माझी वसुंधरा अभियानात साक्री तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे. त्यात म्हसाळे पंचायतीने पण सहभाग घेतला आहे. या अभियानांतर्गत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनामार्फत पारितोषिक देऊन देण्यात येणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून गावातील नागरिक विद्यार्थी यांना ग्रामसेवक एस. पी. वाघ यांनी हरित शपथ दिली. गावात सांडपाणी व्यवस्थापन, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी नदी-नाले यांचे पुनरुज्जीवन करून वनराई बंधारे बांधून जलव्यवस्थापन कामांवर भर देऊन उत्कृष्ट काम करण्याचा मानस सरपंच भागाबाई दिलीप सोनवणे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी गुलाब सैंदाणे, वना जाधव,उमाजी पवार,योगेश पारधी, सजन माळी, दिलीप सोनवणे आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
म्हसाळे ग्रामपंचायतीचा ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कार्य करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST