लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या प्रत्यक्ष कामकाजाची पहिलीच सभा गुरूवारी कोरम पूर्ण न झाल्याने रद्द करण्याची नामुष्की सभापती वालीबेन मंडोरे यांच्यावर ओढवली़ सभेला सभापती मंडोरे यांच्यासह केवळ चार सदस्य उपस्थित होते़महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती़ ११़१५ वाजता सभापती वालिबेन मंडोरे यांचे सभागृहात आगमन झाले़ तर त्यानंतर नगरसेवक गुलाब माळी, सुभाष खताळ व विश्वनाथ खरात हे देखील सभागृहात आले़ मात्र त्यांच्या व्यतिरीक्त अन्य कोणत्याही नगरसेवकाने सभेला हजेरी लावली नाही़ महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील प्रकरण दोन मधील नियम ड नुसार सभेचे कामकाज चालविण्यासाठी किमान ५ सदस्यांची उपस्थिती असणे आवश्यक असते़ मात्र कोरम पूर्ण न झाल्याने अखेर सभापती वालिबेन मंडोरे यांनी सभा रद्द करीत असल्याची घोषणा केली़ प्रत्यक्ष कामकाजाच्या पहिल्याच सभेला सभापतींवर सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवली़ विशेष म्हणजे स्थायीचे बहूतांश सदस्य मनपा आवारातच उपस्थित होते़
धुळे मनपा स्थायी समितीची सभा कोरम पूर्ण न झाल्याने रद्द करण्याची नामुष्की!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:45 IST
पहिल्याच सभेकडे सदस्यांची पाठ, सभापतींसह केवळ ४ सदस्य उपस्थित
धुळे मनपा स्थायी समितीची सभा कोरम पूर्ण न झाल्याने रद्द करण्याची नामुष्की!
ठळक मुद्देसभेकडे सदस्यांनी फिरवली पाठ१६ पैकी केवळ चार सदस्य उपस्थितपहिलीच सभा रद्द करण्याची सभापतींवर नामुष्की