शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांचा मार्गदर्शनपर मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:10 IST

दोंडाईचा : परिसरातील ५१ बचतगटाच्या २५० महिलांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : येथील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अनुलोम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईचा शहर व परिसरातील बचतगटांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात ५१ बचत गटाच्या सुमारे २५० महिला उपस्थित होत्या.दोंडाईचा येथील व्यापारी भवनात विविध बचत गटातील महिलांना विविध उद्योग धंदे, बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नाबार्डचे विवेक पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा पुजा नितिन खडसे, अनुलोम संस्थेचे निलेश राजपूत, पंचायत समितीचे महेंद्र ठाकरे, बचतगट प्रवर्तक अनिल भावसार उपस्थित होते.पूजा खडसे यांनी प्रास्ताविकातून विविध बचतगटांना शासनाच्या योजना, बचतगटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे, त्यांच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.विवेक पाटील म्हणाले, बचतगटातील महिला विविध वस्तू बनवितात. त्यात शोभेच्या वस्तू, गोधडी व इतर वस्तू तयार करतात. काही महिला ब्युटीपार्लर, टेलरींग, पिठाची गिरणी यातून सेवा देतात. विविध वस्तू उत्पादन व सेवा देताना महिलांना अडचणींना सामोरे जावे लागते. बनविलेल्या वस्तूंच्या मार्केटींगला अडचणी येतात, यावर चर्चा करण्यासाठी कार्यक्रम आहे. तुमच्या अडचणी सोडविल्या जातील. तुम्हाला एन.यू.एल.एम.च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. तालुका जिल्हा, राज्य पातळीवर बचत गटातील महिलांना मार्केटिंग संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्ड मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.पंचायत समितीचे महेंद्र ठाकरे, अनुलोम निलेश राजपूत यांनीही महिलांना बचतगट व येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सदस्य रेवती बागुल, लक्ष्मी ठाकूर, विजया ठाकूर, सरिता महाजन आदींसह ५१ बचतगटाच्या सुमारे २५० महिला उपस्थित होत्या. सुत्रसंचलन रेवती बागुल यांनी केले. आभार पूजा खडसे यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे