लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आणि शिक्षक सेना महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जगतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पंचायत समितीच्या सभागृहात महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला़ त्यात महिला सक्षमीकरणावर चर्चा झाली़कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या विद्या पाटील, शिक्षणाधिकारी मनीष पवार, राज्य राखीव दलाच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा भरोसे, डॉ़ सुप्रिया पाटील, अन्याय अत्याचार समितीच्या सचिव तथा पश्चिम खान्देश दलित संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी प्रेमलता जाधव, शिक्षक सेनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष दीपक पवार, औरंगाबाद महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वाती सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दंडगव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा पवार, धाराऊ प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सुरेखा नांद्रे, महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे सामाजिक कार्यकर्त्या गितांजली कोळी आदी उपस्थित होते़
जागतिक महिला दिनानिमित्त शिक्षक सेनेतर्फे मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:21 IST