शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
3
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
4
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
5
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
8
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
9
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
10
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
11
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
12
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
13
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
14
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
15
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
16
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
17
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
18
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
19
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
20
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिका-यासह परिचरही जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 19:10 IST

कापडणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवृत्त रुग्णवाहिका चालकाचे मंजूर होणाºया बिलातून लाचेची मागणी करणाºया वैद्यकीय अधिकारी आणि लाच स्विकारणारा परिचर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी रंगेहात पकडले़ कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचा चालक हा सेवानिवृत्त झालेला आहे़ त्याने त्याच्या मंजूर झालेले प्रवासभत्ता व ओव्हरटाईम बिलाचे मोबदल्यात वैद्यकीय अधिकारी डॉ़ जयश्री ठाणसिंग ठाकूर यांनी ७ हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ त्यानंतर तक्रारदार याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती़ तक्रारीच्या अनुषंगाने २८ मे रोजी पडताळणी करण्यात आली़ तडजोडीअंती ५ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याने गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला़ वैद्यकीय अधिकारी जयश्री ठाकूर यांच्या सांगण्यावरुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे परिचर दिलीप देवराम निकुंभे यांनी ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले़ या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील जयंत साळवे, संतोष हिरे, संदिप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, भूषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, प्रकाश सोनार, शरद काटके, संदिप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी