अर्थे खुर्द गावाचे सरपंच दिपाली अनिल पाटील, उपसरपंच उषाबाई दयाराम बडगुजर व गटनेता अनिल मंगल पाटील यांनी सगळीकडून निधी मिळवून गावाच्या भल्यासाठी ३ वर्षात सुमारे सव्वा कोटी रूपयांची विकासाची कामे पूर्ण केली आहेत़ गत २६ जानेवारीला गावात विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोर्कापण सोहळा कार्यक्रम झाला़ त्यात ग्रामदैवत देवमढी, लोकपूजन, ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण, सभागृह भूमिपूजन, अंगणवाडी डिजिटल वर्ग, भूमिगत गटार भूमिपूजन, अंगणवाडी साहित्य लोकार्पण, पिठ गिरणी लोकार्पण, जि़प़शाळा वॉटर फिल्टर, जि़प़शाळा, साहित्य, विद्युतपोल व वीजवाहिनी लोकार्पणाचा कार्यक्रम झाला़
अर्थे गावात पाणीपट्टी व घरपट्टी भरणाºयांसाठी वर्षभर मोफत पिठाची गिरणी सुरू केली आहे़. शेत कामासाठी एकरी १५०० रूपये लागत असेल तेथे ते ट्रॅक्टर घेवून अवघे ७०० रूपयात कामे करून देत आहेत़ आदर्श ग्रामपंचायतींचा आदर्श घेवून ते गावात नाविण्यपूर्ण विकासाची कामे करीत आहेत़ गावातील भानगडी सोडून गावाचा विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे कामे केली तर निश्चितच गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही़
ग्रामपंचायत डिजीटल झाल्याने ग्रामपंचायतीचे सर्व दप्तर संगणीकृत करण्यात आले आहे़ तसेच गावात विविध विकास कामे करण्यात आली आहेत़ गावात सभामंडप बांधकाम, रस्ते, गटारी तसेच आमदार निधी, डोंगरी विकास निधी, दलित वस्ती सुधार योजना अशा विविध योजनेतून विविध विकास कामे करण्यात आली आहेत़ यासाठी सरपंच दिपाली अनिल पाटील, उपसरपंच उषाबाई दयाराम बडगुजर, ग्रामसेवक राजेंद्र आधार माळी, लोकप्रतिनिधी अनिल गुजर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश पवार, किरण कोळी, विकास गुजर, अमर परदेशी, किस्मत भिल, सुधाकर चौधरी, भैया तिरमले, बुधा गवळे, राजू भिल, दिपक गुजर, जानकीराम गुजर यांच्या मदतीने गावात विकास करता आला आहे़
गटविकास अधिकारी वाय़डी़शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी आऱझेड़मोरे यांनी ग्रां़प़दप्तराची तपासणी करून मार्गदर्शन केले़ यासाठी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव पी़जी़मोरे यांचे सहकार्य लाभले़