शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना मारहाण केल्याप्रकरणी महापौर, त्यांच्या नगरसेवक मुलासह आठ जणांविरूद्ध गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:22 IST

धुळ्यातील घटना : मोबाईल हिसकावला, आरोपींच्या अटकेचे प्रयत्न, पोलिसांची माहिती 

लोकमत आॅनलाईन धुळे : शहरातील जुने धुळे परिसरात किरकोळ कारणावरून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना महापौर चंद्रकांत सोनार, त्यांचा मुलगा नगरसेवक देवा सोनार व जमावाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमावेळी घडली. याप्रकरणी महापौर, देवा सोनार व अन्य आठ जणांविरूद्ध आझादनगर पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी स्वत: या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता जुने धुळे परिसरातील सागर चव्हाण याच्या लग्नानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. तेथे भेट दिल्यानंतर जिल्हाप्रमुख माळी  केशव येडू माळी, दिनेश कोळेकर आदी कार्यकर्त्यांसह चिंचेच्या झाडाजवळ उभे होते. त्यावेळी तेथे महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक देवा सोनार व अन्य आठ जण तेथे आले आणि माळी यांच्या मागे थोड्या अंतरावर उभे राहिले. देवा सोनार याने जिल्हाप्रमुख माळी यांच्याजवळ उभ्या असलेल्या कोळेकर यास आवाज देऊन बोलविले. परंतु तो आला नाही. त्याचा राग आल्याने चंद्रकांत सोनार, देवा सोनार, त्याचा भाऊ भूषण सोनार व इतरांनी यांनी चाकू, लोखंडी रॉडच्या सहाय्याने जिल्हाप्रमुख माळी यांच्यावर हल्ला केला. त्यांना खाली पाडून शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून माळी यांना वाचविले. परंतु यावेळी त्यांचा तीन हजार रुपये किमतीचा नवा मोबाईल फोन खिशातून बाहेर काढला असता देवा सोनार याने तो हिसकावला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आझादनगर पोलिसांत महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक देवा सोनार, भूषण सोनार, भैय्या उर्फ नरेंद्र मधुकर सोनार, चंद्रकांत सोनार यांचे दोन पुतणे (नाव माहिती नाही), टिंक्या प्रकाश बडगुजर, शुभम बडगुजर, किरण वराडे व इतर जमावाविरूद्ध भादंवि कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी