शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

रंधे विद्यालयात गणित साहित्य मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:18 IST

शिरपूर : मेळाव्यात ५६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, भावेश शिंपी प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ.विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारतीय गणित विश्वातला तेजस्वी तारा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन व राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.हर्षाली रंधे यांच्याहस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन डॉ.सुमिता गवळी यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशा रंधे होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, गणित हा विषय अनेकांना अवघड जातो. या विषयाविषयी ममत्व वाटण्याऐवजी भीतीच अनेक मुलांच्या मनात असते. अशा गणित साहित्य प्रदर्शनामुळे मनातील गणितीय भीती दूर होण्यास मदत होते. मेळाव्यात सुमारे ५६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांना गणित शिक्षक वंदना पांडे, निकिता राजपूत, महेश राजपूत यांनी मार्गदर्शन केले. गणितीय स्पर्धेत प्रथम क्रमांक- भावेश शिंपी (गणितीय युक्त्या), द्वितीय- हर्षाली नितीन पाटील, अंशु विश्वकर्मा (भागाकार पद्धत), तर तृतीय क्रमांक लिकांक्षा पवार (गुणकाराची लॅटिक पद्धत) यांनी मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला. स्पर्धेत परीक्षक म्हणून सुरेखा चौधरी, आस्विनी भामरे यांनी काम पाहिले. याप्रसंगी प्राचार्या कामिनी पाटील, सारिका ततार, मनीषा पाटील, शगुफ्ता पिंजारी, रिदवना शेख, भूषण पाटील, नेहा गिरासे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन शितल चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे