शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृध्दासह महिलांना गंडा घालणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 11:47 IST

संशयित पालघरचा : शहर पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्देधुळे शहर पोलिसांची कामगिरीदिशाभूल करणारा गजाआडसामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अज्ञानाचा गैरफायदा घेत व खोटी सहानुभूती दाखवत वृध्दांसह महिलांची दिशाभूल करणाºया पालघर (मुंबई) येथील निवृत्ती एकनाथ जाधव (४५) याला शहर पोलिसांच्या पथकाने संशयावरुन गुरुवारी अटक केली़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते़ शहरातील गल्ली नंबर ५ मधील एका बँकेच्या बाहेर असलेल्या एटीएम मशिनजवळ गेल्या काही दिवसांपासून उभा राहून वृध्द महिलांना पैसे काढण्यासाठी तो मदत करत होता़ त्याने या माध्यमातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला़ मदतीच्या बहाण्याने तो अज्ञानाचा गैरफायदा घेत एटीएमधारकांना लुबाडत होता. जेवढी रक्कम काढायला संबंधित सांगायचे तो तेवढी रक्कम काढून हातचलाखी करत त्यातून एक हजार रुपये सहजपणे काढून घ्यायचा़ त्याने ही बाब कोणाच्याही लक्षात येऊ दिली नव्हती़ विशेष म्हणजे आज एवढेच पैसे निघत असल्याचे खोटे सांगून तो नागरिकांची दिशाभूल करत होता़ तसेच त्याने पैशांच्या आकाराचे बंडल तयार करुन आपल्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा करुन द्या़ मला पैशांची गरज नाही़ ज्यावेळेस लागतील त्यावेळेस आपल्या एटीएमने काढले जातील, असे सांगून त्याने पैशांची हेराफेरी केली़ ही बाब पोलिसांच्या पथकाला समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले़