मानसी बंब ही धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी असून, येथील मोहन बंब व जैन महिला मंडळ पदाधिकारी सुवर्णा बंब यांची ती कन्या आहे.
मानसी हिने वेगवेगळ्या गीतगायन स्पर्धेत भाग घेत, जिल्हा, राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविले आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवतींना महावीर इंटरनॅशनल नाशिक संस्थेतर्फे सुकन्या पुरस्कार दिला जातो. संस्थेचे चेअरमन अनिल नाहर, सचिव राजेंद्र बाफना, महिला प्रमुख संगीता बाफना यांनी हा पुरस्कार जाहीर केला. तिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोरकुंड ग्रामस्थांनी मानसी व तिच्या पालकांचे कौतुक केले आहे.
भाजप व्यापारी आघाडी
जागतिक महिला दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी धुळे तर्फे कार्यकारिणीतील महिला व्यावसायिक सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
धुळे जिल्हा भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हर्षकुमार रेलन यांच्या साक्री रोडच्या संपर्क कार्यालय येथे १५ सन्माननीय महिला व्यावसायिकाचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी उपाध्यक्ष उमेश जैन, सचिव चेतन दीक्षित, सुरेश कुन्दनानी, अशोक मेघानी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्या वतीने कष्टकरी, महिलाचा जागतिक महिला दिनानिमित्त गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय पवार, जिल्हाध्यक्ष सुरज अहिरराव, महिला जिल्हाध्यक्षा सुनिता सोनारव समस्त कष्टकरी महिला उपस्थित होते.