लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने सुरू केलेल्या सार्वजनिक शौचालय अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांनी केले आहे.वान्मथी सी.यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे हा स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचा एक महत्वाचा घटक आहे. केंद्र सरकारच्या पेयजय आणि स्वच्छता विभागाने स्थलांतरीत मजुर आणि तरंगत्या लोकसंख्येसाठी ग्रामीण भागात सर्व गावांमध्ये सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याच्या सूचना आहेत. या अभियानातून स्थलांतरीत मजूर आणि तरंगत्या लोकसंख्येला सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचा नियमित वापर करणे, गावस्तरावर या सुविधांप्रती मालकी हक्काची भावना निर्माण करणे ही अभियानाची उद्दिट्ये आहेत.१५ जूनपासून सुरू झालेले हे अभियान १५ सप्टेंबर २० पर्यंत असेल. विविध मुद्यांच्या आधारे जिल्ह्याच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यात येणार आहे. सहभाी होण्याचे आवाहन वान्मथी सी. यांच्यासह पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांनी केले आहे.
सार्व.शौचालय अभियान यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:25 IST