शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

नवलनगर (ता. धुळे) येथे कायमस्वरूपी दारूबंदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 11:46 IST

महिलांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली मागणी

ठळक मुद्देदारूमुळे व्यसनाधिनता वाढलीदारू विक्रेत्यांवर कारवाईची गरजदारूबंदीसाठी महिलांची निदर्शने

आॅनलाइन लोकमतधुळे :तालुक्यातील नवलनगर येथे दारू विक्रीचे व व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मौजे नवलनगर येथे कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी, अशी ग्रामपंचायत सरपंचासह महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.जिल्हा प्रशासनामार्फत गृहराज्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नवलनगरमधील विविध भागात तसेच रस्त्यालगत असलेल्या छोट्या टपऱ्यांवर, हॉटेल, ढाब्यांवर सर्रासपणे देशी-विदेशी दारू विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. बाहेरगावाहून काहीजण दारू पिण्यासाठी नवलनगरला येतात, धिंगाणा घालत असतात. त्यामुळे बसस्थानकाजवळून जाणाºया येणाºया प्रवाशांना किंवा ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतो. गावात शिक्षणाची सोय असल्याने, आजुबाजुच्या परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी नवलनगरला येत असतात. शाळा सुटल्यावर विद्यार्थिनींची चेष्टा, छेड या मद्दपींकडून केली जात असते.गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंदीसाठी महिलांनी कंबर कसलेली आहे. धुळ्याकडून गावाकडे येतांना विविध हॉटेल्स, ढाबे असून, त्यावर सर्रास दारू विक्री होत असते. गावातही काहीठिकाणी दारू विक्री होते. दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शॉपिंगमध्ये, गावठाणच्या जागेवर कोणी दारूविक्री किंवा व्यवसाय करीत असेल त्याच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर सरपंच शोभा भिल, यांच्यासह उपसरपंच महेंद्र पाटील, ग्राम विकास अधिकारी एस.एस. वाघ यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.यावेळी नवलनगरच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली.मागणीचे निवेदन पालकमंत्री दादा भुसे, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह इतर अधिकाºयांनाही दिले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे