धुळे : गायत्री परिवारतर्फे देशाभरात घरोघरी गृहे गायत्री यज्ञाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहरातील १०८ घरांमध्ये यज्ञाव्दारे पुजा करण्यात आली़ संस्थापक आचार्य युगऋषि पंडित श्रीराम शर्मा यांच्या महानिर्वाण दिवसानिमित्त रविवारी सकाळी ९ ते १२ वेळेत एकाच वेळी २ लाख ४० हजार घरामध्ये गायत्री यज्ञाव्दारे पुजा झाली़ धुळे गायत्री परिवार शाखेमार्फत शहरात १०८ घरांमध्ये गृहे गायत्री यज्ञ करण्यात आला़ या वेळी यज्ञ करण्याचे फायदे तसेच घरात संस्कारी वातावरण कसे तयार करता येईल़ याबाबत माहिती दिली. पर्यावरण सरंक्षण, वातावरण परी शोधन, सुरक्षित व समृद्ध राष्ट्र निर्माण बनविण्याच्या घरोघरी अध्यात्मिक उपक्रम राबविण्यात आला़ शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यात देखील शेकडो घरामध्ये उपक्रम राबविण्यात आला़ अशी माहिती परिवाराचे जिल्हा समन्वयक एनक़े़उपाध्ये यांनी दिली़
घरोघरी होमकुंडात महायज्ञ सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:17 IST