तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी मूर्ती, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, गणपती, महादेव, नंदी, कासव, पादुका यांच्या मूर्तींचा प्राण प्रतिष्ठा सोहळा हा कार्यक्रम आप्पा महाराज मालपुरकर, वेदमूर्ती भरतजी दायमा महाराज उज्जैन, वेदमूर्ती गजेंद्र महाराज चाळीसगांव, प्रशांत महाराज वाडेकर, हर्षवर्धनजी महाराज पुराणिक मालपुरकर, रामायनार्थ मंदार शास्त्री महाराज नाशिक, प्रसाद महाराज मुंबई, अर्थर टोपले महाराज नाशिक, शुक्ला वाघमारे (गायन वादक), आदिनाथ वाडेकर ( तबला विशारद) यांच्या उपस्थितीत हा सात दिवसीय कार्यक्रम झाला. २ सप्टेंबर रोजी रात्री समाजप्रबोधनकार ह.भ.प माई राजे पाटील (जळगाव) यांचे कीर्तन झाले.या कीर्तनात त्यांनी सांगितले की एकादशीच्या दिवशी महाप्रसादाच्या कार्यक्रमात प्रसाद खाल्ला तर उपवास मोडत नाही. महाप्रसाद हा फराळच असतो. शुक्रवारी महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला होता. यावेळी पंच कमिटी, सर्व कोळी समाज बांधव व गावातील परिसरातील महर्षी वाल्मिकी ऋषी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST