आॅनलाईनधुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लळींग कुराणात अश्चिल चाळे करणाऱ्या मुला-मुलींचे पाच जोडप्यांवर दामिनी पथकाने बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारवाई केली. यावेळी पळून जाणाऱ्यांना पथकाने पाठलाग करून पकडले. मुला-मुलींना समज देवून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून दामिनी पथकाने रोडरोमिओ, तसेच निर्मनुष्य भागात अश्लील चाळे करणाºया प्रेमीयुगुलांविरूद्ध कारवाईचे सत्र सुरू केले आहे. सोमवारी या पथकाने लळींग कुराणात धाड टाकून एका अल्पवयीन युगुलाला ताब्यात घेतले होते.या पथकाने बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पुन्हा लळींग कुराणात धाड टाकली. त्याठिकाणी मुला-मुलींचे पाच जोडपे चाळे करतांना आढळून आले. दरम्यान पथक आल्याचे समजताच काही मुलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील सदस्यांनी या मुलांचा पाठलाग करून त्यांना पकडले. असे असले तरी एकजण फरार होण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेतलेल्या नऊ जणांना मोहाडी पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये मुला-मुलींच्या पालकांनाही बोलविण्यात आले. पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांनी या तरूण-तरूणींना समज देवून त्यांना पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचारी मनीषा गायकवाड, नेहा विभूते, मेघावीनी पवार आणि चालक चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली़
धुळ्यात पाठलाग करून प्रेमीयुगुलांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 11:29 IST