शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

धुळ्यातील कुशन दुकानाला आग, लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 9:41 PM

पवन नगरातील घटना : शॉर्ट सर्किटचा अंदाज

ठळक मुद्देधुळ्यातील साक्री रोडवरील पवन नगरातील घटनाआगीत कॉम्प्लेक्समधील चार दुकानांचे नुकसानसायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात नोंदच नव्हती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चाळीसगाव रोडवरील पवन नगरात असलेल्या कॉम्प्लेक्समधील चार दुकानाला आग लागली़ यात दुकानातील कुशन जळून खाक झाले़ ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ ही आग शॉकसर्किटने लागल्याचा अंदाज आहे़ चाळीसगाव रोडवर पवन नगरलगत मुल्ला कॉम्प्लेक्स आहे़ या कॉम्प्लेक्समध्ये तळ मजल्यावर दुकाने असून वरच्या मजल्यावर निवास आहेत़ रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र नामक कुशन दुकानात अचानक आग लागली़ आग लागल्याचे कळताच तातडीने या भागातील नागरीकांनी महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला बोलाविले़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी अवघ्या काही मिनीटांत दाखल झाले़ त्यांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला़ याशिवाय महामार्गावरील एका बंबाला पाचारण करण्यात आले़ एकूण तीन बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला़ या तौसिफ शहा यांचे रॉयल कार या दुकानाला आग लागली़ यात सीट कव्हर, कुशन व भंगाराचे साहित्य जळून खाक झाले़ अंदाजे ७० हजाराचे नुकसान झाले़ सलाम सय्यद यांचे न्यू महाराष्ट्र कुशन दुकानाला आग लागली़ त्यात कुशन जळून खाक झाले़ त्यात अंदाजे ४० हजाराचे नुकसान झाले़ तनवीर खान यांचे मणियार मोटर्स दुकानाला आग लागली़ त्यात कुशन जळून खाक झाल्याने अंदाजे १२ हजाराचे नुकसान झाले़ तसेच विलास चौधरी यांचे मेडीकल दुकान आहे़ त्यांचे विजेचे मीटर जळाल्याने अंदाजे १० हजाराचे नुकसान आहे़ असे एकूण १ लाख ३२ हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ या आगीत दुकानातील कुशन जळून खाक झाले असलेतरी नेमके किती रुपयांचे नुकसान झाले याचा कोणताही आकडा अद्याप समजलेला नाही़ आग शॉकसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले होते़ दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची कोणतीही नोंद झालेली नव्हती़