शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पथविक्रेत्यांना टाळेबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:21 IST

दोंडाईचा : पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेत आधारकार्डला मोबाईल लिंकिंगचा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोरोना टाळेबंदीत पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला असून त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल देण्याची योजना कार्यरत झाली आहे. दोंडाईचा नगरपालिकेने सुद्धा या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. नगरपालिका हद्दीत ५११ पथविक्रेते आहेत. या योजनेसाठी आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न मोबाईल क्रमांक असणे अनिवार्य आहे. परंतू बहुतांश पथविक्रेत्यांच्या आधारकार्डला मोबाईल लिंकिंग नसल्याने या योजनेला अडसर निर्माण झाला आहे.कोरोना टाळेबंदीत छोटे दुकानदार, पथविक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ते अल्प भांडवलावर सर्वसामान्य ग्राहकाला सेवा देतात.परंतू कोरोना काळात त्यांचे भांडवलही संपले आहे. त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या वित्त विभागाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे. या योजनेत ७ टक्के दराने फेरीवाल्यास १० हजार रुपयांचा वित्त पुरवठा केला जाणार आहे.दोंडाईचा नगरपालिकेमार्फत या योजनेसाठी आॅनलाईन सर्व्हे झाला असून शहरात ५११ फेरीवाले आढळून आले आहेत. पथविक्रेत्यास ओळखपत्र आवश्यक असून तो नगरपालिका हद्दीतला असल्याचे शिफारसपत्र आवश्यक आहे. या योजनेसाठी नागरी सुविधा केंद्रात जाऊन आॅनलाईन ५० रुपयांचा फॉर्म भरावा लागेल.तो फेरीवाला नगरपालिका हद्दीतील असून त्याचे नाव असल्याचे व्हेरिफिकेशन नगरपालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी करतील. या योजनेसाठी समिती गठीत करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष मुख्याधिकारी असतील. परंतू या योजनेसाठी फेरीवाल्याकडे आधार कार्ड व आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंकिंग (संलग्न) असणे आवश्यक आहे.दोंडाईचा नगरपालिका हद्दीत ५११ पथविक्रेते असल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल भावसार यांनी सांगितले. परंतू ५११ पथविक्रेत्यांपैकी बहुतांश पथविक्रेत्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंकिंग नाही. यामुळे पथविक्रेत्यांची मोठी अडचण झाली आहे. सद्यस्थितीत दोंडाईचात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आधारकेंद्र बंद आहेत. त्यामुळे लिकिंगला अडचणी येत आहेत.ही योजना नगरपालिका व बँक अधिकारी यांच्यामार्फत राबविली जात आहे. बँकेमार्फत १० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार असून ७ टक्के व्याज दर आकारला जाणार आहे. वर्षभरात नियमित कर्ज फेडणाऱ्यास आर्थिक सवलत दिली जाणार आहे. परंतू अद्याप दोंडाईच्यातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत कोणत्याही पथविक्रेत्यांनी प्रकरण दाखल केले नसल्याची माहिती बँक व्यवस्थापकाने दिली आहे. निर्धारित वेळेत बँकेत प्रकरण पोहचले नाही तर या योजनेचा फायदा पथविक्रेत्यांना मिळणे मुश्किल आहे.लहान विक्रेत्यांनी, पथविक्रेत्यांनी तात्काळ आॅनलाईन अर्ज दाखल करून पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेऊन पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, प्रभारी मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल भावसार आदींनी केले आहे.