शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

म्हसदी येथे लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:20 IST

कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू : गावात सर्वेक्षणाचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : येथील कोरोनाग्रस्त ६५ वर्षीय महिलेचा उपचार दरम्यान धुळे येथे मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून म्हसदी (प्र.नेर) गाव तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रविण चव्हाणके यांनी दिली.याकाळात केवळ दवाखाना व मेडिकल सुरू राहतील. या व्यतिरीक्त अन्य व्यावसायिकांनी दुकाने उघडल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित बैठकीत दिला.म्हसदी गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने गेल्या चार महिन्यांपासून काळजी घेतली होती. यासाठी ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझरची फवारणी व मोफत मास्क वाटप केले. मात्र अचानक रूग्ण आढळून आल्यामुळे आणि उपचार दरम्यान रूग्णाचा मृत्यू झाल्यामुळे खळखळ उडाली आहे. त्यामुळे रूग्ण राहत असलेला भाग सील करण्यात आला आहे. तर रूग्णाच्या संपर्कातील पाच जणांना तपासणीसाठी भाडणे (ता.साक्री) येथील कोवीड सेंटरला पाठवण्यात आले आहे. तेथे त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर गावात ग्रामपंचायतीच्या वतीने निजंर्तुकीकरणासाठी फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर रूग्णाचा परिसर कन्टेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक सण साजरे करता येणार नाहीत. पाच पेक्षा जास्त जण एकत्र दिसल्यास कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही तहसीलदार प्रविण चव्हाणके यांनी बैठकीत दिला. यावेळी ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच कुंदन देवरे, ग्रामविस्तार अधिकारी जे.पी.खाडे, शिक्षण विस्तार अधिकारी सी.पी.अहिरे, वैद्यकीय अधिकारी कल्याणी पवार, पोलिस पाटील पोपटराव देवरे, आरोग्य सहाय्यक पी.व्ही.देवरे, आरोग्य सेविका कल्पना सोनवणे तसेच गावातील किराणा व्यावसायीक, खासगी वैद्यकीयआशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्यावतीने शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचाऱ्यांच्यावतीने गावात चौदा टीमच्या माध्यमातून आरोग्य सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.