शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ८५ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 11:43 IST

जिल्हा मध्यवर्ती बॅँक : दुस-या यादीची शेतकºयांना प्रतीक्षा

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी पहिल्या यादीत पात्र ठरविण्यात आलेल्या २,४४५ पैकी आतापर्यंत केवळ जिल्हा बॅँकेच्या ८५ शेतकºयांची कर्जमाफी जाहीर झाली आहे. अजून २३६० शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शासनातर्फे कर्जमाफीसाठी दुसरी यादीही लवकरच जाहीर करण्याचे सांगण्यात आले होते.मात्र, दुसरी यादी अद्याप ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर जाहीर झालेली नाही. यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत पहिल्या ग्रीन (कर्जमाफीसाठी पात्र) २,४४५ शेतकºयांची नावे जाहीर केली होती. पैकी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ८५ कर्जदार शेतकºयांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली. दरम्यान, कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या दुसºया यादीची प्रतीक्षा आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकºयांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर शासनाने आॅनलाइन या किचकट प्रणालीद्वारे शेतकºयांचे अर्ज स्वीकारले. या कठीण परिस्थितीतही जिल्ह्यातील ९१ हजार ८६८ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. त्यानुसार शासनाने पहिली ग्रीन यादी (पात्र शेतकरी) जाहीर झाली. या यादीत २,४४५ शेतकºयांची नावे होती. त्यात धुळे तालुका २४३, साक्री ४६७, शिंदखेडा १००७ व शिरपूर ७२८ शेतकरी पहिल्या यादीत पात्र ठरले होते.धुळे जिल्ह्यातील फक्त १४ शेतकºयांचा समावेश पहिल्या यादीत २ हजार ४४५ शेतकºयांची नावे जाहीर केल्यानंतर यात जिल्हा बॅँकेच्या ८५ कर्जदार शेतकºयांची नावे होती. त्यात धुळे जिल्ह्यातील १४ व नंदुरबार जिल्ह्यातील ७१ शेतकºयांचा समावेश होता. या शेतकºयांना कर्जमाफीसाठी आवश्यक असलेले २८ लाख ५० हजार ३१७ रुपयांचा निधी जिल्हा बॅँकेला गेल्या महिन्यातच शासनाकडून प्राप्त झाला होता. त्यानंतर कर्जदार शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी करून जिल्हा बॅँकेच्या ८५ कर्जदार शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली आहे.

 पहिल्या यादीत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या यादीत जिल्हा बॅँकेच्या ८५ शेतकºयांची नावे होती. त्यासाठी शासनाकडून निधीही मिळाला होता. त्यानुसार संबंधित शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली असून अद्याप दुसरी यादी जाहीर झालेली नाही.     - धीरज चौधरी,     मुख्य कार्यकारी अधिकारी,     धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅँक