शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

तब्बल सोळा महिने धुळ्यात होते वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:01 IST

भारतरत्न सर विश्वेश्वरैया : शहराची पाणीपुरवठा योजना व रचना करण्यात योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अभियंता दिन साजरा केला जातो त्यानिमित्त विश्वेश्वरैय्या यांच्या कार्याविषयी घेतला आढावाविश्वेश्वरैय्या यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कोलार जिल्ह्यातील मोक्षगुंडम येथे झाला होता़ त्यांचा आंध्रप्रदेशात जरी झाला तरी महाराष्टाशी आणि विशेष करुन धुळे शहराशी विशेष नाते होते. विश्वेश्वरैय्या यांच्या कारकिदीर्ची मुहूर्तमेढ धुळ्यातून झाली होती़ १८८४ ते १९०८ पर्यंत ते मुंबई सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक इंजिनीअर पदावर होते. १८८४ च्या मार्च महिन्यात नाशिक येथे असिस्टंट इंजिनियर म्हणून बांधकाम विभागात नियुक्ती झाली होती़ त्यानंतर नाशिक येथून धुळ्यात विश्वेश्वरैय्या यांची बदली झाली होती़तेव्हा विश्वेश्वरय्या बांधकाम विभागाच्या जुन्या कार्यालयातील एका खोलीत बसत होते़ त्याकाळात त्यांनी शहराचा सखोल अभ्यास करून डेडरगाव तलाव ते धुळे शहर जलवाहिनी, दातर्ती येथील सायफन्स, पांझरा नदीवरील १८८ फड बंधाऱ्याची कामे केली होती़विश्वेश्वरैय्या यांच्या आठवणी धुळेकरांच्या कायम स्मारणात राहण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयात एक सुंदर स्मारक व संग्रहालय उभारण्यात आले आहे़स्मृती संग्रहालयात त्यांच्या आठवणीधुळे शहरातील बांधकाम विभागात भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या स्मृती समितीने विश्वेश्वरय्या स्मृती संग्रहालय उभारले आहे. यामध्ये विश्वेश्वरय्या यांचा जीवनप्रवास आणि काही खास फोटो पहायला मिळतात. त्यामुळे धुळेकरांना त्यांचा आठवणी कायमस्वरूपी स्मारणात राहतील़

टॅग्स :Dhuleधुळे