शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद - नवीन मराठी उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:17 IST

संडे स्पेशल मुलाखत  सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सदस्य संग्राम लिमये - अपयश यशाची पहिली पायरी समजली जाते व्यवसाय करतांना अपयश येत असेल तर खचून न जाता योग्य नियोजन केल्यास प्रगती साधता येते.

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक होण्याची प्रेरणा मिळण्यासाठी सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालयाशी सामंजस्य करार केला आहे़  युवा उद्योजक सेलच्या माध्यमातून नवीन मराठी उद्योजकता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात़ सदस्यांच्या माध्यमातुन आतापर्यत साडे बारा करोड रुपयांची उलाढाल यशस्वीरित्या झाली आहे, असे इंजि.संग्राम लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  

प्रश्न : उद्योगात अपयश येईल अशी भीती असलेल्यांना आपण काय सांगाल?उत्तर: पहिल्यांदा कोणताही छोटा-मोठा उद्योग करतांना अपयश येईल अशी भिती मनात असते़ मात्र उद्योजकांची मानसिकता बदलणे हा सॅटर्डे क्लब मुख्य उद्देश आहे बहुतांश मराठी तरुण उद्योगाकडे रिस्क म्हणून बघतात संधी म्हणून बघत नाही नोकरी मिळाली नाही तर नाईलाजाने म्हणून उद्योगाकडे वळतात अशा मानसिकतेतून उद्योग सुरू केल्यास तो सफल व्हायची शक्यता कमी असते.प्रश्न : उद्योगाचा वारसा नसतांना उद्योग उभारणीसाठी संस्थेची काय मदत होईल?उत्तर: उद्योग क्षेत्रामध्ये बहुतांश उद्योजकांना पहिल्या पिढीचा वारसा असल्याने त्यांना अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता भासत नाही़ मात्र उद्योगाचा वारसा व अनुभव नसलेल्या उद्योजकांना अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाते़ त्यामुळे दरवर्षी विविध क्षेत्रातील उद्योजक आपल्या उद्योगाची उभारणी करतात़ प्रश्न : उद्योग वाढीसाठी उद्योजकांना कोणती मदत केली जाते ? उत्तर: व्यवसाय वाढीसाठी वेगवेगळ्या परिषदा, चर्चासत्रांचे आयोजन केले जाते ज्यामधून त्यांना यशस्वी उद्योजकांचे अनुभव व मार्गदर्शन मिळते़ इंटरनॅशनल बिझनेस सेलच्या माध्यमातून इम्पोर्ट-एक्सपोर्टसह देशाबरोबर व्यापार कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले जाते. एकाच व्यवसायातील लोकांनी एकमेकांकडे प्रतिस्पर्धी म्हणून न बघता एकत्र येत सहकार्याच्या (कोलेबोरेशन)च्या माध्यमातून कसे काम वाढवता येईल याबद्दल मदत केली जाते़ स्वर्गीय माधवराव भिडे यांनी २००० मध्ये मुंबईत या संस्थेची स्थापना केली़ क्लबच्या राज्यात ५७  शाखा  तर ३ हजार सभासद आहेत. दर महिन्यातून २ वेळा उद्योजकांनी एकत्र यावे व त्यांचा व्यवसाय वृद्धीसाठी एकमेकांना मदत करावी, असा हेतू आहे.

मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातुन व्यवसायाची वृध्दीएकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हे बोधवाक्य घेऊन महाराष्ट्रीयन उद्योजकांना मदत करणारी संस्था आहे़ सॅटर्डे क्लबने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेलच्या माध्यमातून  मोबाईल अप्लिकेशन डेव्हलप केले आहे़ ज्यामध्ये सॅटर्डे क्लबच्या संपूर्ण सभासदांचा डेटा उपलब्ध असतो. प्रत्येक गावातील वेगवेगळे सभासद कुठल्या व्यवसायात आहेत, कुठल्या प्रकारच्या सेवा देतात याबद्दल माहिती मोबाइल अँप्लिकेशनच्या माध्यमातून मिळते, त्याआधारे सभासदांना व्यवसाय वाढवायला निश्चित मदत मिळते़

टॅग्स :Dhuleधुळे