शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप; धुळे न्यायालयाचा निकाल

By देवेंद्र पाठक | Updated: December 11, 2023 21:19 IST

शिरपूर तालुक्यातील कढईपाणी येथे घडली होती घटना

देवेंद्र पाठक, धुळे : भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पित्यावर चाकूने वार करीत खून करणाऱ्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दिला. सुखराम पेमा पावरा (वय ५१, रा. कढईपाणी, पो. उर्मदा, ता. शिरपूर) असे आरोपीचे नाव आहे. पेमा पावरा असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

सुखराम पावरा आणि त्याची पत्नी बायटाबाई पावरा यांच्यात १६ जून २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राहते घरी भांडण सुरू होते. त्यावेळी सुखराम याचे वडील पेमा पावरा हे भांडण सोडविण्यासाठी आले असता सुखराम याने त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या पाठीत चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यामुळे पेमा पावरा रक्ताच्या थारोळ्यात पडले. ही घटना सुखरामची आई शिमलीबाई पेमा पावरा हिने प्रत्यक्ष पाहिली होती. घटनेनंतर आरोपी पळून गेला. त्यानंतर मयत पेमा पावरा याचा लहान मुलगा बिक्रम पावरा हा शेतातून सायंकाळी घरी आला. तेव्हा त्याच्या आईने त्याच्यासह ग्रामस्थांना घटनाक्रम सांगितला. त्यानंतर जखमी पेमा पावरा यांना शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

मयताच्या लहान मुलगा विक्रम पावरा याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसात संशयित आरोपी सुखराम पावरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. खटल्याचे कामकाज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात झाले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय मुरक्या यांनी एकूण ८ साक्षीदारांचा साक्ष नोंदविल्या. त्यावरून न्यायालयाने आरोपीने पेमा पावरा यांचा चाकूने मारून खून केला हे ग्राह्य धरले. न्यायालयाने आरोपी सुखराम पेमा पावरा याला जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास त्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी. डी. भोईटे यांचे सहकार्य लाभले. तर अतिरिक्त सरकारी वकील संजय मुरक्या यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय