शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गोवर्धन डोंगरावर पेटला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:46 IST

लामकानी : पन्नास हेक्टरमध्ये जंगलाचे नुकसान, दोन तासांनी दाखल झाले अग्नीशमन दल, ग्रामस्थांनी विझवली आग

लोकमत न्यूज नेटवर्कलामकानी : धुळे तालुक्यातील लामकानी वन क्षेत्रामध्ये चिंचवार रस्त्याच्या पश्चिमेला गोवर्धन डोंगरावर रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमाराला वणवा पेटल्याने जंगलाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़लामकानी वनक्षेत्रामध्ये गवताचे प्रमाण जास्त आहे़ उन्हाळ्यामुळे गवत कोरडे झाले आहे़ तापमानाचा पारा वाढल्याने कोरड्या गवताने पेट घेतल्यामुळे वणवा पेटला असावा असा प्राथमिक अंदाज आहे़सायंकाळी साडेचार वाजेला वणवा पेटला त्यावेळी उन्हाचे चटके जाणवत होते़ डोंगराला आग लागल्याचे निदर्शनाला येताच गावकऱ्यांनी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली़ वन विभागाचे कर्मचारी देखील तातडीने दाखल झाले़ धुळे येथे अग्नीशमन दलाला दूरध्वनीवरुन वणवा पेटल्याचे माहिती देण्यात आली़ तत्पूर्वी गावकºयांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले होते़ माती आणि गोणपाट, कापडांचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अथक प्रयत्न तरुणांनी केले़ परंतु वाºयाचा वेग अधिक असल्याने एका ठिकाणची आग विझवली तर दुसºया ठिकाणी आग लागत होती़ तब्बल दोन तास आगीचे तांडव सुरु होते़ गवत कोरडे असल्याने आमीचे लोळ आणि धूर यांमुळे वन क्षेत्रामध्ये कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण वाढले होते़ आग विझविण्यास अडचणी येत होत्या़ परंतु वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेवून आग अटोक्यात आणली़दरम्यान, आगीची माहिती तात्काळ देवूनही अग्नीशमन दलाचे जवान तब्बल दोन तास उशिरा म्हणजे सव्वा सहा वाजेच्या दरम्यान एका बंबासह दाखल झाले़ तोपर्यंत आग अटोक्यात आली असल्याने ग्रामस्थांनी नारोजी व्यक्त केली़जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसानया वणव्यात जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ तब्बल पन्नास ते साठ हेक्टरवरील जंगलाला आग लागल्याने गवत आणि झाडे जळून खाक झाली आहेत़ तसेच ससे, साप, पक्षी, प्राणी मोठ्या प्रमाणावर आगीच्या भक्षस्थानी पडल्याचा अंदाज आहे़ त्यांची आश्रयस्थाने देखील नष्ट झाली आहेत़ या आगीत लामकानी परिसरात जंगलाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ वन विभागाचे कर्मचारी सोमवारी पंचनामा करणार असून जंगलात नेमके किती नुकसान झाले हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे़ वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना माहिती कळविण्यात आली आहे, असे कर्मचाºयांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे