शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

प्राथमिक शिक्षणासोबतच स्वयंरोजगाराचे देता धडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:49 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क मुलांनी केवळ शिक्षण घेऊन भविष्यात पुस्तकी किडा होऊ नये़ तसेच शिक्षणासोबतच त्यांना भविष्यात ...

ठळक मुद्देकधी बेरोजगार होण्याची भिती वाटली नाही़अष्टपैलू शिक्षक म्हणून झाला गौरवआई- वडिलांनी ही संधी उपलब्ध करून दिली.संकेत स्थळावर माझ्या हस्तकलेला प्रसिद्धी देण्यात आली

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कमुलांनी केवळ शिक्षण घेऊन भविष्यात पुस्तकी किडा होऊ नये़ तसेच शिक्षणासोबतच त्यांना भविष्यात बेरोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी आदिवासी मुलांना प्राथमिक शिक्षण सोबतच व्यवसायिक केलेचे धडे शिकविण्याचा ध्यास घेतला आहे़ त्यामुळे भविष्यात त्यांना स्व:ताचा व्यवसाय उभा करता येवू शकतो, असे मत शिरपूर तालुक्यातील टेंभेपाडा जि़प़ शिक्षक अशोक सोनवणे यांनी ‘लोकमत ’शी बोलतांना सांगितले़प्रश्न: आतापर्यत किती मुलांना हस्त कला शिकविल्यात?उत्तर: जिल्हा परिषद टेंभेपाडा येथील आदिवासी शाळेत १५० मुलं शिक्षण घेत आहेत़ शाळेतील मुलांना प्राथमिक शिक्षणासोबतच हस्तकला व शिल्पकला असे नवनवीन प्रयोग करून घेतो़ त्यामुळे त्यांना बौध्दीक कलेची वाव व रोजगाराचे धडे शिकण्यास मिळतात़प्रश्न: आतापर्यत कोण-कोणत्या हस्तकला तुम्ही साकरल्या आहेत?उत्तर: देशातील ताजमहल, गेट वे आॅफ इंडिया, लाल किल्ला, इंडिया गेट, कुतूबमिनार, सांचीस्तूप अशा विख्यात इमारतींच्या हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या आहेत़ त्यासाठी थर्माकोल, माऊंटबोर्ड पेपर, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, शाडूमाती यासारख्या साहित्याचा वापर केला आहे. या सगळ्या वास्तू शाळेतल्या मुलांना त्यांच्या वैशिष्ठ्यांसह दाखवून त्यांना शिकविल्या जातात़प्रश्न: तुमच्या कोणत्या हस्तकलेचा निवड झाली?उत्तर: सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात मी साकारलेले घोडयाच्या शिल्पांची निवड झाली होती. अनेकांकडून या कलेचे कौतूकही झाले होते़ २०१७ मध्ये पुण्यातील समता शिक्षा विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली व राज्यातील कलाशिक्षणाच्या संकेत स्थळावर माझ्या हस्तकलेला प्रसिद्धी देण्यात आली होती़कधी बेरोजगार होण्याची भिती वाटली नाही़मला चित्र, शिल्पं, संगीताची बालपणापासून आवड आहे. आई- वडिलांनी ही संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मला बालवयात कला अवगत झाली़ कलेच्या जोरावर मी कधी भविष्यात बेरोजगार होईल अशी मनात कधीच भिती निर्माण झाली नाही़अष्टपैलू शिक्षक म्हणून झाला गौरवआपल्या ठाई असलेल्या कलेचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयोग करून घेणाऱ्या सोनवणे यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिरपूर येथील योगविद्याधाम सेवाभावी संस्थेकडून प्रसिद्धी परान्मुख कलाकार म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच २०१९ यावर्षी बहुउद्देशिय कुणबी पाटील महिला मंडळाकडून देखील अष्टपैलू शिक्षक म्हणून गौरव झाला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे