शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्म संघातर्फे धुळ्यातील बर्वे छात्रालयात व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 11:33 IST

अ‍ॅड.एम.एस. पाटील : छत्रपती शिवरायांना सर्व जाती-धर्माविषयी आपुलकी

ठळक मुद्देअ‍ॅड. एम. एस. पाटील पुढे म्हणाले, की राजा कसा हवा? याचे सर्वोत्कृष्ट आदर्श उदाहरण शिवाजी राजे यांचे आहे. ते शिस्तप्रिय होते. तसेच त्यांचा सर्वांवर वचक होता. शिवराय हे जातपात मानत नव्हते.त्यांच्या काळात आरमार आणि तोफखान्याचे प्रमुख मुस्लीम समाजाचे होते; तर हेर विभागाचे प्रमुख दलित समाजाचे होते. यावेळी डॉ. विजयचंद्र जाधव म्हणाले, की कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे जाणता राजा म्हणजे जाज्ज्वल्य देशभक्ती, सौजन्यपूर्ती व स्वधर्मासह अन्य धर्मीयांवर सतत प्रेम करणारे ते राजे होते.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  स्वराज्यात प्रेम, समता, बंधूभाव आणि न्यायाचे अधिराज्य होते. सर्व जाती, धर्माच्या रयतेचे सुख, दु:खाची चिंता व आपुलकी असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे श्रीमंत योगी व प्रगल्भ बुद्धीमत्तेचे होते. त्यांच्या काळात जनता गुण्यागोविंदाने नांदत होती.  त्याकाळी एकही जातीय दंगल झाल्याची नोंद नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एम.एस. पाटील यांनी येथे केले. सर्वधर्म संघातर्फे रविवारी  बर्वे कन्या छात्रालयाच्या सभागृहात व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जैन अमोल वाचनालयाचे प्रा. प्रेमसुख छाजेड होते. प्रारंभी सर्वधर्म प्रार्थना सादर करण्यात आली. प्रास्ताविक शंकर पवार यांनी केले. यावेळी त्यांनी काव्य सादर केले. यानंतर शाहीर भटू गिरमकर यांनी ‘शिवबाचा जन्म सोहळा’ हा पोवाडा सादर करीत येथे उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी झुंबरलाल शर्मा, दलित मित्र ज्योत्स्राताई खैरनार, शेख हुसेन गुरूजी,  डॉ. विजयचंद्र जाधव, गणेश पाठक, विश्वास भट, सुरेश लोंढे, प्रा. प्रभा निकुंभे, रवींद्र अन्सारी, सुनीता बोरसे, गुलाबराव मोरे, शाहीर माणिक शिंदे, रंजना नेवे, रुस्तम कुरेशी, अंजली पाटील, महेंद्र बैसाणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कविवर्य अमृतसागर यांच्या ‘एक शिवा अन् एक भीमाईचा भीमा’ या बोधप्रद गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन दत्तात्रय कल्याणकर यांनी केले. आभार श्रीकृष्ण बेडसे यांनी मानले.